Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी डोनाल्ड ट्रम्प यांचा TikTok, WeChatसारख्या चीन Appsवरील बंदीचा निर्णय जो बायडेन यांनी...

डोनाल्ड ट्रम्प यांचा TikTok, WeChatसारख्या चीन Appsवरील बंदीचा निर्णय जो बायडेन यांनी खोडला!

Related Story

- Advertisement -

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉक (TikTok), व्हीचॅट (WeChat) सारख्या चीन Appsवर बंदी घातली होती. पण आता राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना निर्णय खोडला आहे. अमेरिकेच्या बायडेन प्रशासन आता Appsचे स्वतः पुनरावलोकन करून निर्णय घेणार आहे. पण यासंबंधीत आदेशावर जो बायडेन यांनी स्वाक्षरी केली आहे.

बुधवारी जो बायडेन यांनी टिकटॉक आणि व्हीचॅट यासह अनेक चिनी Appsवर ट्रम्प यांच्याद्वारे करण्यात आलेली बंदी रद्द करण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. आता अमेरिकन वाणिज्य सचिव चीन कंपन्याच्या मालकीचे या Appsची तपासणी करेल. कारण या Appsमुळे अमेरिकन डेटा गोपनियता किंवा राष्ट्रीय सुरक्षेस धोका निर्माण करू शकते. दरम्यान अमेरिकेत टिकटॉकचे १० कोटींहून अधिक युजर्स आहेत.

- Advertisement -

 

- Advertisement -

अमेरिका आणि चीन यांच्या तणावा दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला एक मोठा झटका दिला होता. ट्रम्प यांनी आठ चिनी Appsवर बंदी घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. हे सर्व Apps चिन कंपनीशी संबंधित होते. या Appsद्वारे युजर्सचा डाटा चीन सरकारपर्यंत पोहोचत होता, असे ट्रम्प यांचे म्हणणे होते. पण आता ट्रम्प यांच्या बंदी निर्णय रद्द करण्याच्या आदेशावर बायाडेन यांनी स्वाक्षरी केली आहे. भारताने देखील टिकटॉक सारख्या चिनी Appsवर बंदी घातली आहे. भारताने आतापर्यंत २२४ चिनी Appsवर बंदी घातली आहे, या निर्णयाचे अमेरिकन प्रशासन आणि खासदारांनी स्वागत केले होते.


हेही वाचा – Corona Vaccination: दोन वर्षांच्या चिमुरड्यावर कोरोना लसीचे जगातील पहिले ट्रायल कानपूरमध्ये


 

- Advertisement -