Coronavirus: धक्कादायक! दर तासाला २६०० जण होत आहेत कोरोनाबाधित

अमेरिकेत दर तासाला २ हजार ६०० जण बाधित होत असल्याचे समोर आले आहे.

us records 2600 new coronavirus cases every hour as total approaches 4 million
कोरोना

वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या ४० लाखापर्यंत गेली आहे. तसेच गेल्या १०० पेक्षा जास्त दिवसांमध्ये कोरोनाच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून दर तासाला २ हजार ६०० जण बाधित होत असल्याचे समोर आले आहे.

पहिल्या ९८ दिवसांपर्यंत अमेरिकेत १० लाख कोरोना केसेस आढळून आल्या. त्यानंतर ४३ दिवसांमध्ये ही संख्या २० लाखांवर गेली. मागील २७ दिवसांमध्ये हे प्रमाण ३० लाखांवर गेले. त्यानंतर मागील १६ दिवसांमध्ये ही संख्या ४० लीखांवर गेली आहे. तर सध्याच्या घडीला अमेरिकेत दर मिनिटाला ४३ जणांना कोरोनाची लागण होत असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

सुरुवातीच्या काळात कोरोना विषाणूला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फारसे गांभीर्याने घेतले नव्हते. त्यांनी या व्हायरसला चायना व्हायरस वगैरे अशी नावंही ठेवली. तसेच सातत्याने या मुद्द्यावरुन चीनवर टीकाही केली. तसेच त्यांनी लॉकडाऊन देखील लागू गेले नव्हते. त्यामुळे त्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.


हेही वाचा – धक्कादायक! लव्ह मॅरेज मोडण्यासाठी मुलीला ठरवलं पॉझिटिव्ह