Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी भारतात येणाऱ्या Johnson & Johnsonच्या लसीवर अमेरिकेत तात्पुरती बंदी

भारतात येणाऱ्या Johnson & Johnsonच्या लसीवर अमेरिकेत तात्पुरती बंदी

Related Story

- Advertisement -

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. यादरम्यान कोरोना लसी संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पहिल्यांदा एस्‍ट्राजेनेकाच्या लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होत असल्याच्या केसेस समोर आल्या होत्या. आता जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson Vaccine) लसीत अशीच समस्या उद्भवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता अमेरिकेने जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीवर तात्पुरती बंदी घातली आहे.

- Advertisement -

अमेरिकेच्या एफडीआयने याबाबत निवेदन जाहीर करताना सांगितले की, ‘आम्ही खबरदारी म्हणून सध्या जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीवर तात्पुरती बंदी घातली आहे.’ अमेरिकेत लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या झाल्याच्या सहा घटना घडल्या. प्रशासनाचे याचा आढावा घेतला आहे. रक्ताच्या गुठळ्या होण्याचे दुष्परिणाम खूप दुर्मिळ असतात. युरोपियन मेडिसीन एजन्सीने या लसीचा आढावा घेतला आहे.

अमेरिकन एजंन्सी एफडीआयने म्हटले की, ‘या रक्ताच्या गुठळ्यावर उपचार इतरांपेक्षा वेगळे आहेत. बुधवारी सीडीसी अॅडवायजर कमेटी ऑफ इम्युनायजेशन प्रॅक्टिस बैठक बोलवणार आहे. या बैठकीत आतापर्यंत आढळलेल्या अशा केसेसचा आढावा घेतला जाईल आणि पुढील रणनीती तयार केली जाईल.’ एफडीए देखील याचा आढावा घेणार असून रक्ताच्या गुठळ्या झालेल्या केसेसची तपासणी करेल. जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत या लसीवर बंदीचा निर्णय घेणार आहे.

- Advertisement -

अमेरिकेतील चार क्लिनिकने पहिल्यांदाचा जॉन्सन अँड जॉन्सवर लसीवर बंदी घातली होती. जॉर्जियाच्या क्यूमिंग्समध्ये आठ लोकांवरील लसीचे साइड इफेक्ट समोर आले होते. हे आठ जण ४२५ लोकांमध्ये सामिल होते, ज्यांना जॉन्सन अँड जॉन्सनची लस देण्यात आली होती. अमेरिकेच्या कॉलोराडोमध्ये ११ लोकांवर साइड इफेक्ट दिसले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उत्तर कॅरोलिनामध्ये १८ जणांवर साइड इफेक्ट झाल्याचे समोर आले होते.

जॉन्सन अँड जॉन्सन लसीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील दोन डोस घेण्याची गरज नव्हती. फक्त एक डोस पुरेसा असल्याचे सांगितले होते. दरम्यान भारतात जॉन्सन अँड जॉन्सन लसीला आपात्कालीन वापरासाठी लवकरच मान्यता मिळणार असल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा – Corona Vaccine: भारतात Sputnik V ची किंमत काय असणार?


 

- Advertisement -