Afghanistan: अफगाणिस्तानसंदर्भात रशियाने बोलावली महत्त्वाची बैठक, अमेरिकेने उपस्थित राहण्यास दिला नकार

US says won't join Afghanistan talks announced by Russia
Afghanistan: अफगाणिस्तानसंदर्भात रशियाने बोलावली महत्त्वाची बैठक, अमेरिकेने उपस्थित राहण्यास दिला नकार

अफगाणिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीवर रशियाने एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ‘मास्को फार्मेट’ बैठकमध्ये रशियाने अमेरिकेच्या शिष्टमंडळाला आमंत्रित केले आहे. तसेच रशियाने तालिबानच्या प्रतिनिधींना देखील बैठकीत उपस्थितीत राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानमधील सत्तेवर ताबा मिळवल्यानंतर ही पहिली बैठक होत आहे. परंतु आता या बैठकीमध्ये उपस्थितीत राहण्यास अमेरिकेने नकार दिला आहे.

अमेरिकेने म्हटले आहे की, ‘रशियाने घोषित केलेल्या अफगाणिस्तानसंदर्भातील बैठकीमध्ये उपस्थितीत राहणार नाही आहे.’ ज्यामध्ये इतर दोन देश चीन आणि पाकिस्तान सामील होणार आहेत. परदेशी विभागाने यासाठी लॉजिस्टिक मुद्द्यांना जबाबदार ठरवले आहे, परंतु म्हटले की, अमेरिका रशियान नेतृत्ववाल्या मंचला ‘रचनात्मक’ मानतो.

अमेरिकेचे परदेशी विभागाचे प्रवक्ते नेड प्राईस सोमवारी म्हणाले की, ‘आम्ही पुढे या मंचामध्ये सामील होण्यासाठी उत्सुक आहोत. परंतु या आठवड्यात आम्ही उपस्थितीत राहणार नाही.’

रशियन राजदूत झमीर काबुलोव शुक्रवारी म्हणाले की, ‘मास्कोमध्ये चार देशांमध्ये चर्चा असल्याची घोषणा करत म्हटले होते की, त्यांचे लक्ष्य अफगाणिस्तानमधील बदलत्या स्थितीसंदर्भात एका सामान्य स्थितीवर काम करने आहे.’

दरम्यान अमेरिकेने बांग्लादेशमधील अल्पसंख्याक हिंदू समुदायवर हल्ल्या झाल्याप्रकरणी निषेध व्यक्त केला आहे. परदेशी विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले की, ‘धर्म किंवा श्रद्धेच्या स्वातंत्र्याचा अधिकार मानवाला आहे. जगभरातील प्रत्येक व्यक्तीला त्याचा धार्मिक संबंध असो किंवा श्रद्धा असो ते उत्साहाने साजरा करण्यासाठी सुरक्षित आणि समर्थित वाटले पाहिजे. बांग्लादेशमध्ये हिंदू समुदायावरील हल्ल्यावर अमेरिका तीव्र निषेध व्यक्त करते.’


हेही वाचा – Balochistan University Explosion: क्वेटाच्या बलूचिस्तान यूनिवर्सिटीजवळ मोठा स्फोट, एकाचा मृत्यू १७ जण जखमी