घरताज्या घडामोडीCoronaVirus: भारतातील हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्यांची गुणवत्ता कमी - अमेरिकन वैज्ञानिक

CoronaVirus: भारतातील हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्यांची गुणवत्ता कमी – अमेरिकन वैज्ञानिक

Subscribe

अमेरिकेच्या एका वैज्ञानिकाने हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्यांची कमी गुणवत्ता असल्याचा दावा केला आहे.

अमेरिकेला कोरोनाच्या संकटात भारताने मोठी मदत केली. भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या गोळीच्या साठ्यातला काही साठा अमेरिकेला दिला. दोन जहाजातून अमेरिकेला या गोळ्यांचा साठा पाठवण्यात आला होता. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. अमेरिकेसह अनेक देशांना भारताने या गोळ्यांच्या साठा निर्यात केला आहे. मात्र आता हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्यांची गुणवत्ता कमी असल्याचा दावा अमेरिकेच्या वैज्ञानिकाने केला आहे.

यासंदर्भात मंगळवारी अमेरिकेच्या काऊन्सिल ऑफिसमध्ये वैज्ञानिक डॉ. रिक ब्राइट यांनी तक्रार केली आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, भारताकडून येणाऱ्या मलेरियाच्या गोळ्या म्हणजेच हायड्रोक्सीक्लोरोक्वीन कमी गुणवत्ता असलेल्या आहेत. शिवाय पीपीई कीट्सची देखील गुणवत्ता चांगली नसल्याचे म्हटले आहे. अमेरिकेतच्या या वैज्ञानिकाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

सध्या डॉ. ब्राइट यांना त्यांच्या पदावरून काढले आहे. यापूर्वी ते बायोमेडिकल अॅडवांस्ड रिसर्च डेव्हलपमेंट अथॉरिटीचे प्रमुख होते. ही संशोधन संस्था अमेरिकेच्या हेल्थ अॅण्ड ह्यूमन सर्व्हिस (एचएचएस) विभागावर देखरेख ठेवण्याचे काम करते. डॉ. ब्राइट यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, भारतात तयार होणाऱ्या औषध कंपन्यांची तपासणी फेडरल ड्रग असोसिएशन (एफडीए)ने केली नाही आहे. या परिस्थितीत भारतातून येणाऱ्या औषधांबाबत चिंता वाटत आहे. अशा कंपन्यांची औषध संक्रमित असू शकतात. जर गुणवत्ताहीन औषध दिली तर नुकसान होऊ शकते. हे सर्व माहित असूनही ट्रम्प प्रशासनाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या बाजारात ही औषध मोठ्या प्रमाणात आणली.


हेही वाचा – CoronaVirus: रामचरित मानस ग्रंथात महामारीचा उल्लेख, जाणून घ्या सत्य

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -