घरदेश-विदेशUS Student Death: भारतीय विद्यार्थ्यांचं मृत्यू सत्र थांबेना; अमेरिकेत एका महिन्यात चौघांनी...

US Student Death: भारतीय विद्यार्थ्यांचं मृत्यू सत्र थांबेना; अमेरिकेत एका महिन्यात चौघांनी गमावला जीव

Subscribe

अमेरिकेत आणखी एका भारतीय अमेरिकन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. महिनाभरातील ही चौथी घटना आहे.

न्यूयॉर्क: अमेरिकेत आणखी एका भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. महिनाभरातील ही चौथी घटना आहे. अमेरिकन पोलीस ओहायोमध्ये भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्याच्या मृत्यूची चौकशी करत आहेत, ही चौथी घटना आहे. न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने सांगितले की, सिनसिनाटी येथील लिंडनर स्कूल ऑफ बिझनेसचा विद्यार्थी श्रेयस रेड्डी बेनिगेरी याच्या मृत्यूमध्ये सध्या कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झाल्याचा संशय नाही. (US Student Death Death of Indian students does not stop session Four people lost their lives in one month in America)

“ओहायोमध्ये भारतीय वंशाचा विद्यार्थी श्रेयस रेड्डी बेनिगेरीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे खूप दुःख झाले आहे,” असे वाणिज्य दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. घटनेबाबत अधिक माहिती न देता वाणिज्य दूतावासाकडून सांगण्यात आले की, ‘पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. यावेळी कोणताही गैरप्रकार झाल्याचा संशय नाही. भारतात राहणाऱ्या बेनिगेरी यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली असून, त्यांचे वडील लवकरच भारतातून अमेरिकेत येणार असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच पर्ड्यू विद्यापीठात शिकणारा भारतीय वंशाचा विद्यार्थी नील आचार्य मृतावस्थेत आढळला होता. त्यापूर्वी, जॉर्जिया राज्यातील लिथोनिया शहरात, एका बेघर व्यसनी व्यक्तीने 25 वर्षीय भारतीय विद्यार्थी विवेक सैनीच्या डोक्यावर हातोड्याने सुमारे 50 वार केले होते, परिणामी त्याचा मृत्यू झाला होता. युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय अर्बाना-चॅम्पेन (UIUC) मध्ये अकुल बी धवन हा 18 वर्षीय विद्यार्थी गेल्या महिन्यात मृतावस्थेत आढळला होता. तो हायपोथर्मिग्रस्त (अशी स्थिती ज्यामध्ये शरीराचे तापमान सामान्य तापमानापेक्षा कमी होते) असल्याचे आढळून आले.

- Advertisement -

(हेही वाचा: Bhujbal On Damania : भाजपामध्ये जाण्याच्या चर्चेवर छगन भुजबळ म्हणाले; “मला कोणतीही ऑफर नाही” )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -