घरदेश-विदेशपर्यटन, विद्यार्थ्यांसाठी महागला अमेरिकेचा व्हिसा; 'या' तारखेपासून लागू होणार नवे दर

पर्यटन, विद्यार्थ्यांसाठी महागला अमेरिकेचा व्हिसा; ‘या’ तारखेपासून लागू होणार नवे दर

Subscribe

अमेरिकेत शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी तसेच पर्यटक यांच्यासाठी अमेरिकेचा व्हिसा महागला आहे. आता अमेरिकेच्या व्हिसासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. हे नवीन दर 30 मे 2023 पासून लागू करण्यात येणार आहेत.

अमेरिकेत शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी तसेच पर्यटक यांच्यासाठी अमेरिकेचा व्हिसा महागला आहे. आता अमेरिकेच्या व्हिसासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. हे नवीन दर 30 मे 2023 पासून लागू करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या तसेच, पर्यटनासाठी जाणाऱ्यांना आपल्या खिशातून अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. (US Student tourist Visas to get costly for Indian know how much to pay know in details )

एक प्रसिद्धीपत्रक जारी करत अमेरिकेने याबाबत माहिती दिली आहे. विशिष्ट नाॅन- इमिग्रंट व्हिसा अॅप्लिकेशन प्रक्रिया शुल्कात वाढ करण्याबाबत हे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. 30 मे 2023 पासून प्रभावी, व्यवसाय किंवा पर्यटनासाठी विद्यार्थी व्हिसासाठी शुल्क आणि नाॅन-इमिग्रंट व्हिसा अॅप्लिकेशन आधारित विद्यार्थी आणि एक्सचेंज व्हिजिटर व्हिसाच्या दरात 160 डाॅलरवरुन 185 डाॅरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तात्पुरत्या कामगारांसाठी ठराविक याचिका आधारित नाॅन-इमिग्रंट व्हिसासाठी शुल्क 190 वरुन 205 डाॅलरपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. व्यापारी, गुंतवणूकदार आणि विशेष व्यवसायातील करार अर्जांसाठी शुल्क 205 वरुन 315 डाॅलर पर्यंत वाढवण्यात आले आहे.

- Advertisement -

असा होणार परिणाम

मागील वर्षाच्या 1 ऑक्टोबर रोजी किंवा त्यानंतर केलेल्या व्हिसाच्या मुलाखतींसाठी सर्व शुल्क पेमेंट फी पेमेंट इनव्हाॅइस जारी केलेल्या तारखेपासून 365 दिवसांसाठी वैध आहेत. 1 ऑक्टोबर 2022 पूर्वी अर्जदारांनी भरलेले शुल्क 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहणार आहे. अर्जदारांनी 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहील. अर्जदारांनी 30 सप्टेंबर 2023 पूर्वी मुलाखत शेड्युल करणे आवश्यक आहे किंवा मुलाखत माफीचा अर्ज सबमिट करणे आवश्यक असल्याचेही म्हटले आहे.

( हेही वाचा: पंतप्रधान मोदींच्या ‘टायगर रिजर्व्ह प्रकल्प’ भेटीवर काँग्रेसचा सवाल; म्हणाले, ‘इंदिरा गांधी…’ )

दरवाढीमुळे प्रभावित झालेल्या व्हिसा श्रेणी खालीलप्रमाणे

  • B1: व्यवसाय; घरगुती कर्मचारी किंवा आया-परदेशी राष्ट्रीय नियोक्त्यासोबत असणे आवश्यक आहे.
  • B2: पर्यटन, सुट्टी
  • H: कामाचा व्हिसा
  • L : इंट्रा- कंपनी हस्तांतरणकर्ता
  • O : विज्ञान, कला, शिक्षण, व्यवसाय किंवा अॅथलेटिक्समध्ये असाधारण क्षमता असलेले परदेशी नागरिक
  • P : परफाॅर्मिंग एॅथलीट, कलाकार, मनोरंजन करणारे
  • Q : आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाण पाहुणे
  • R : धार्मिक कार्यकर्ते
  • E : करार व्यापारी/ संधी गुंतवणूकदार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -