Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Corona Vaccine: कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक घेतलेल्यांना अमेरिकेत शिक्षणासाठी जायचे असेल तर पुन्हा...

Corona Vaccine: कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक घेतलेल्यांना अमेरिकेत शिक्षणासाठी जायचे असेल तर पुन्हा घ्यावी लागणार लस

Related Story

- Advertisement -

अमेरिकेन भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुटनिक व्ही लसीवर अविश्वास दाखवला आहे. त्यामुळे आता जर अमेरिकेत शिकायला जायचे असेल तर पुन्हा कोरोना लस घ्यावी लागणार आहे. असाच काहीसा अनुभव भारतातील अनेक विद्यार्थ्यांना आला आहे. २५ वर्षीय मिलोनी दोषीला कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्स डिग्री घ्यायची होती. मिलोनीने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचे दोन डोस घेतले होते. परंतु अजून कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता मिळाली नाही आहे. त्यामुळे कोलंबिया युनिव्हर्सिटीने जर या लसीचे डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये आले तर त्यांना पुन्हा लस घ्यावी लागले, असे त्यांना सांगितले. पण अद्याप याबाबत कोणत्या तज्ज्ञ किंवा डॉक्टरने पुन्हा लस घेणे किती सुरक्षित आहे, सांगितले नाही आहे.

मिलोनी दोषी ही अशी एकच विद्यार्थी नसून अनेक लाखो विद्यार्थी आहेत, ज्यांनी कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक-व्ही लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. परंतु त्यांना अमेरिकेत आल्यावर पुन्हा लस घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये दोन वेगवेगळ्या लसीचे डोस घेणे किती सुरक्षित आहे? याबाबत भीती निर्माण झाली आहे.

- Advertisement -

अमेरिकेची वेबसाईट न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार, मार्चपासून आतापर्यंत अमेरिकेच्या ४०० हून जास्त युनिव्हर्सिटीने अशा प्रकारचा आदेश जारी केला आहे. ज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक लस घेतली आहे, त्यांना पुन्हा लस घेण्यास सांगितले आहे. कारण या दोन्ही लसींना अजूनपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता मिळाली नाही आहे.

आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेने आठ लसींना आपात्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. यामध्ये अमेरिकेच्या तीन लस – फायझल-बायोएनटेक, मॉडर्ना आणि जॉनसन अँड जॉनसन. तर याशिवाय कोविशिल्ड आणि चीनच्या सायनोवॅकचा समावेश आहे.


- Advertisement -

हेही वाचा – भारतात आढळला कोरोनाचा धोकादायक New Variant ; ७ दिवसात वजन होते कमी


 

- Advertisement -