घरताज्या घडामोडीबापरे! आता Russia-Ukraine War मध्ये Chemical Attack करण्याचे प्लॅनिंग

बापरे! आता Russia-Ukraine War मध्ये Chemical Attack करण्याचे प्लॅनिंग

Subscribe

रशिया आणि युक्रेन युद्धाचा आज 15वा दिवस आहे. युद्धाच्या तणावपूर्वक परिस्थितीत अमेरिकेने दावा केला आहे की, रशिया युक्रेनवर केमिकल किंवा जैविक हत्याराने हल्ला करू शकतो. व्हाईट हाऊसकडून एक निवदेन जारी करून म्हटले आहे की, रशिया युक्रेनवर बायोलॉजिकल किंवा केमिकल हत्यारच्या माध्यमातून हल्ला करण्याची तयार करत आहे. यावर आपल्याला नजर ठेवायला पाहिजे.

व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी दावा केला की, ‘रशिया चुकीच्या गोष्टींचा आधार घेऊन केमिकल हल्ला करू शकतो. कारण यापूर्वीही रशियाने असे केले आहे. त्यामुळे ही चिंतेची बाब असून रशियावर करडीनजर ठेवणे गरजेचे आहे.’

- Advertisement -

जेन साकी यांनी ट्विट केले की, ‘आपल्याला युक्रेनमधील अमेरिका जैविक हत्यारे लॅब आणि रासायनिक हत्यारांच्या विकासाबाबत रशियच्या खोट्या दाव्यांवर लक्ष दिले पाहिजे. आम्ही चीनच्या अधिकाऱ्यांनाही पाहिले आहे की, ते कशाप्रकारे दाव्यांना समर्थन करत आहेत, जो एक रचलेला कट आहे. आम्ही मागील वर्षात रशियाकडून अशाप्रकारच्या अफवा पूर्वीही युक्रेन आणि इतर देशांबाबत ऐकल्या आहेत, ज्या खोट्या ठरल्या आहेत.’

रशियानेही केला दावा

यादरम्यान रशियाने दावा केला की, ‘त्यांनी युक्रेनमध्ये असे जैविक हत्याराचा शोध लावला आहे, ज्याच्यावर अमेरिकेचा ताबा आहे. या जैविक हत्यारांचा वापर सैन्य करतील.’ दरम्यान असे दावे प्रतिदावे होत असल्यामुळे युद्धात केमिकल हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेत आणखीन भर पडली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Ukraine-Russia War: युद्धात रशियाने 12 हजार सैनिक गमावले, युक्रेनचा दावा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -