‘या’ देशात रुग्णालयात अचानक नसबंदीसाठी पुरुषांच्या रांगाच रांगा

अमेरिकेत नसबंदीसाठी पुरुषांच्या रुग्णालयात रांगा लागल्या असून ऑनलाईन बुकींगमध्येही वाढ झाली आहे

अमेरिकेच्या सर्वौच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक निर्णय दिला.  याअंतर्गत महिलांना ५० वर्षांपासून गर्भपातासाठी देण्यात येणारा घटनात्मक अधिकार रद्द ठरवण्यात आला आहे. यामुळे अमेरिकेत नसबंदीसाठी पुरुषांच्या रुग्णालयात रांगा लागल्या असून ऑनलाईन बुकींगमध्येही वाढ झाली आहे. दिवसाला शेकडो पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेसाठी फोन करत असून अनेकजण वेटींग वर आहेत. अमेरिकेच्या इतिहासात असे पहील्यांदाच घडत असल्याने जगभरात सध्या या नसबंदी वेंटीगची चर्चा आहे.

ओहीयो मधील क्लीवलैंड क्लिनिकमध्ये न्यायालयाच्या निर्णयाआधी नसबंदीसाठी दिवसाला चार बुकींग असायच्या. पण आता दिवसाला १०० तर कधी दिडशे पर्यंत हा आकडा गेला आहे. तर अनेक रुग्णालयांनी आता नसबंदीसाठी स्पेशल डिस्काऊंटही सुरू केले आहेत. यामुळे अमेरिकेत रुग्णांना आकर्षित करण्यासाठी रुग्णालयांमध्येच चुरस लागली आहे.

विशेष म्हणजे अमेरिकी महिलाही आता सजग झाल्या असून सर्वौच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर अमेरिकेत गर्भनिरोध गोळ्यांच्या विक्रीत विक्रमी वाढ झाली आहे. तसेच महिलाही मोठ्या प्रमाणावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पुढे येत आहेत. पण यात पुरुषांच्या नसबंदीचे ९०० टकक्यांनी प्रमाण वाढल्याने जगात याबद्दल आश्चर्य़ व्यक्त केले जात आहे.