घरताज्या घडामोडीन्यूयॉर्क टाइम्सला एलॉन मस्कने म्हटलं 'प्रोपगंडा', ट्विटर अकाउंटवरून काढलं ब्लू टिक

न्यूयॉर्क टाइम्सला एलॉन मस्कने म्हटलं ‘प्रोपगंडा’, ट्विटर अकाउंटवरून काढलं ब्लू टिक

Subscribe

प्रसारमाध्यमांमध्ये दिग्गज असलेल्या न्यूयॉर्क टाइम्सचा गोल्ड व्हेरिफाईड मार्कर ट्विटरने काढल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी न्यूयॉर्क टाइम्सवर टीका करत त्याचे रिपोर्टिंग अपप्रचार असल्याचे म्हटले. त्याचवेळी न्यूयॉर्क टाइम्सचे गोल्ड व्हेरिफाईड मार्कर काढण्यात आले.

प्रसारमाध्यमांमध्ये दिग्गज असलेल्या न्यूयॉर्क टाइम्सचा गोल्ड व्हेरिफाईड मार्कर ट्विटरने काढल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी न्यूयॉर्क टाइम्सवर टीका करत त्याचे रिपोर्टिंग अपप्रचार असल्याचे म्हटले. त्याचवेळी न्यूयॉर्क टाइम्सचे गोल्ड व्हेरिफाईड मार्कर काढण्यात आले. या पार्श्वभूमीवर ‘न्यूयॉर्क टाइम्सची खरी समस्या अशी आहे की, त्याचा प्रचार मनोरंजक नसतो’, असे एलॉन मस्कने म्हटले आहे. तसेच, न्यूयॉर्क टाइम्सच्या सामग्रीची अतिसाराशी तुलना केली असून ते वाचण्यासारखे देखील नसते, असेही म्हटले. (Usa New York Times Loses Twitter Varified Gold Tick After Elon Musk Calls It Propaganda)

गतवर्षी ट्विटरचे मालकी हक्क एलॉन मस्क यांच्याकडे आले. त्यानंतर एलॉन मस्क यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल घडवले. तसेच, ट्विटरच्या व्हेरिफाईड अकाऊंटसाठी ब्लू टिकसाठी शुल्क आकारण्याची घोषणाही केली होती. मस्क यांच्या घोषणेनुसार, 1 एप्रिलपासून व्हेरिफाईड खात्यातून निश्चित रक्कम घेण्यास सुरुवात झाली आहे. मस्क यांच्या या योजनेअंतर्गतच न्यूयॉर्क टाइम्सची ब्लू टिक काढून त्यांना सत्यापित व्यवसाय खात्यासह सोन्याची टिक दिली होती.

- Advertisement -

पैसे देण्यास न्यूयॉर्क टाइम्सचा नकार

सद्यस्थितीत न्यूयॉर्क टाइम्सची गोल्ड टिक काढून टाकण्यात आली आहे. गोल्ड टिक परत मिळवण्यासाठी मासिक 1000 डॉलर भरावे लागणार आहेत. त्यानंतरच इतर संलग्न खात्यांसाठी दरमहा 50-50 डॉलर भरावे लागणार आहेत. मात्र, न्यूयॉर्क टाइम्सच्या म्हणण्यानुसार, ते सत्यापित व्यवसाय खात्यासाठी पैसे देणार नाही. केवळ पत्रकारांसाठी फक्त ब्लू टिक सबस्क्रिप्शन घेऊ, कारण तेच त्यांच्या कामासाठी आवश्यक आहे.

- Advertisement -

आतापर्यंत फक्त सेलिब्रिटी, सरकारी संस्था किंवा प्रसिद्ध चेहऱ्यांनाच ब्लू टिक दिले जात होते. तथापि, आता एलॉन मस्कच्या सबस्क्रिप्शन प्लॅन अंतर्गत, कोणीही दरमहा पैसे देऊन ब्लू टिक घेऊ शकतो. यासोबतच ब्लू टिक वापरकर्त्यांना काही अतिरिक्त सुविधा देखील मिळतील, जसे की ट्विटची वर्ण मर्यादा वाढेल. यासोबतच ट्विटमध्ये एडिट किंवा अनडू पर्यायही उपलब्ध असतील.


हेही वाचा – धक्कादायक! चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशाने लावली सहप्रवाशाला आग; तिघांचा मृत्यू, 9 जण जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -