Steam Therapy साठी प्रेशर कुकरचा वापर, पोलिसांनी लढवली भन्नाट शक्कल

जबरदस्त स्टिम थेरपीचे सर्वत्र कौतुक

use of pressure cookers for steam therapy, a great idea Banglore police
Steam Therapy साठी प्रेशर कुकरचा वापर, पोलिसांनी लढवली भन्नाट शक्कल

कोरोनाने देशात थैमान घातल्यापासून अनेक जण आपला बचाव करण्यासाठी अनेक विविध उपाय करत आहेत. काढा घेणे, घरीच सुप बनवणे असे अनेक प्रकार लॉकडाऊनच्या काळात लोकांनी केले आहेत. त्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे वाफ घेणे. ज्याला आपण स्टिम थेरपी (Steam Therapy)  असे म्हणतो. कोरोनाच्या विषाणूपासून (Covid 19) आपला बचाव करण्यासाठी रोज स्टिम घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनीही अनेकदा सांगितले आहे. घराबाहेर असणाऱ्यांनी दिवसात २-३ वेळा स्टिम घेणे कधीही चांगले. पण घराबाहेर असताना स्टिम कशी घेणार? यावर बंगळूरच्या पोलिसांनी एक भन्नाट आयडीया लढवल्याचे पहायला मिळाले आहे. सध्या या जबरदस्त स्टिम थेरपीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बंगळूरच्या सर्जापूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी प्रेशर कुकरचे इनहेलेशनमध्ये रुपांतर केले आहे. रोज सर्व पोलीस कर्मचारी त्या प्रेशर कुकरच्या भोवताली जमतात आणि स्टिम थेरपी घेतात. स्टिम थेरपीसाठी प्रेशर कुकरमध्ये पाणी भरले जाते. त्या पाण्यात कडुलिंब,तुळस,निलगीरी सारख्या काही औषधी वनस्पती टाकल्या जातात. सर्व वनस्पती कुकरमध्ये शिजवल्या जातात. त्यानंतर प्रेशर कुकरला दोन पाईप जोडले आहेत. ज्यातून एका वेळेस दोन कर्मचारी स्टिम घेऊ शकतात. अशा प्रकारे सर्जापूर पोलीस स्टेशनमध्ये दररोज पोलिसांची स्टिम थेरपी चालते.

सर्जापूर पोलीस स्टेशनमधील पोलीस रोज प्राणायम करतात. त्याचप्रमाणे त्यांना रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गोळ्याही दिल्या जातात. स्टिम थेरपीसाठी ते नवनवीन औषधी वनस्पतीचा वापर करतात. सर्जापूर पोलीस स्टेशनमधील प्रभारी हरीश व्ही यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी काही दिवसांपूर्वी ही स्टिम थेरपी सुरु केली आहे. त्यासाठी त्यांनी आधी कस्टम मेड कुकर ऑर्डर केले. त्याला लांब स्टीलची पाईप जोडली जेणेकरुन एका वेळेस दोन पोलीस कर्मचारी स्टिम घेऊ शकतील. पोलीस स्टेशमधील प्रत्येक कर्मचारी हा ड्युटी संपवून घरी जाताना स्टिम घेऊन घरी जातो.


हेही वाचा – ऑक्सिजन कॉसंट्रेटर्स कसे काम करते? केव्हा आणि कोण याचा कसा वापर करू शकतात?