PETA: लग्न समारंभात घोड्याचा वापर ही क्रूरता; पेटाची भूमिका

Using horses at wedding ceremonies is abusive and cruel said peta
PETA: लग्न समारंभात घोड्याचा वापर ही क्रूरता; पेटाची भूमिका

प्राणी हक्क संस्था पेटा (PETA) म्हणजे People for the Ethical Treatment of Animals. सोमवारी या पेटा संस्थेने ट्वीटर हँडलवरून लग्न समारंभांमध्ये घोड्यांचा वापर करणे, हा प्राण्यांचा छळ आणि क्रूरता असल्याची भूमिका मांडली. पेटाच्या या भूमिकेवरून वाद होणे, हे निश्चित होते. त्याप्रमाणे लोकांनी पेटाच्या या भूमिकेवर विरोध दर्शवून जोरदार ट्वीट करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आज ट्वीटर ट्रेंडिंगमध्ये पेटाचे नाव दिसून आले. काहींनी पेटाची मान्यता रद्द करण्याची मागणी केली, तर काही लोकांनी पेटा ब्राह्मणवादी असल्याचे सांगितले. काही लोकांचे म्हणणे आहे की, पेटाला बकरी ईद निमित्ताने कापलेल्या बकरी दिसत नाहीत का? पेटाने घोड्यांसंदर्भात केलेल्या ट्वीटमुळे सध्या वादाच्या भोवऱ्यात संस्था अडकली आहे.

दरम्यान सोमवारी संध्याकाळी ७ वाजता पेटाने ट्वीटवर लिहिले की, ‘लग्न समारंभात घोड्यांचा वापर करणे हा प्राण्यांचा छळ आणि क्रूरता आहे.’ यानंतर पेटा लोकांच्या निशाण्यावर आली. युजर्सनी पेटाला अँटी हिंदू असल्याचे संबोधले तसेच पेटावर बंदी घालण्याची मागणी केली.

निवृत्त आयपीएस अधिकारी आणि सीबीआयचे माजी संचालक एम नागेश्वर राव यांनी लिहिले की, ‘फ्रॉड पेटा कंपनी अॅक्ट अंतर्गत रजिस्टर्ड एक चॅरिटेबल कंपनी आहे. यांचा उद्देश हिंदूविरोधी आणि भारतविरोधी आहे. त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी टॅग करत लिहिले आहे की, कंपनी कायद्याच्या कलम ८ अंतर्गत पेटाची नोंदणी त्वरित रद्द करा.’


हेही वाचा – Black death: जगावर पून्हा ‘ब्यूबोनिक प्लेग’ महामारीचे संकट, रशियन डॉक्टरांचा इशारा