Goa Election : उत्पल पर्रिकरांची पणजीतून अपक्ष लढण्याची घोषणा, भाजपला मोठा धक्का

पणजी मतदारसंघातून शैलेंद्र वेलिंगकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वेलिंगकर यांची उमेदवारी मागे घेण्यात येणार असल्याचे यापूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

utpal parrikar announces to contest panaji seat in goa election 2022 bjp get damage
Goa Election : उत्पल पर्रिकरांची पणजीतून अपक्ष लढण्याची घोषणा, भाजपला मोठा धक्का

भाजपला गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसणार आहे. गोव्याचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मुलाने अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. उत्पल पर्रिकरांना जागा वाटपात डावलण्यात आले होते. पणजीतूनच निवडणूक लढवण्यावर उत्पल पर्रिकर ठाम होते. हा मतदारसंघ मनोहर पर्रिकर यांचा आहे. सध्या भाजपने विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांना पणजीतून तिकीट देण्यात आले आहे. उत्पल पर्रिकरांना दुसऱ्या दोन जागी उमेदवारी देण्याबाबत पर्याय दिला असल्याची माहिती भाजप निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. अखेर उत्पल पर्रिकरांनी पणजीतून निवडणूक लढण्याबाबतची घोषणा केली आहे.

गोव्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील वातवारण चांगलच तापलं आहे. पणजी येथून उत्पल पर्रिकरांनी अपक्ष निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. माझ्या राजकीय भवितव्याची चिंता कोणी करु नये ते गोव्याची जनता करेल मला गोव्याची चिंता आहे. गेल्यावेळी मला लोकांचा पाठिंबा असताना डावलण्यात आले तेव्हा पार्टीचा विचार केला होता. इथल्या लोकांनीसुद्धा ते पाहिले आहे. पंरतु लोकांसाठी आता मला थांबाव लागत आहे.

मी कोणत्याही पद किंवा पोस्टसाठी हे करत नाही तर माझ्या नैतिकतेसाठी अपक्ष लढणार आहे. मला नंतर काय मिळणार आणि आता काय मिळणार याकडे मी पाहत नाही. माझ्या तत्त्वांसाठी लढणार असल्याचे उत्पल पर्रिकर यांनी म्हटलं आहे. राजकीय कारकिर्दिची चिंता ज्यांनी केली त्यांनी माझ्या भवितव्याची चिंता करु नये असा पलटवार उत्पल पर्रिकरांनी भाजप नेते देवेंद्र फडणीसांवर केला आहे.मागील काही दिवसांपासून उत्पल पर्रिकरांनी गोव्यातील भाजप नेतृत्वार दबाव आणला होता. पणजीतून जागा देण्याची मागणी केली होती. परंतु त्यांना डावलून विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी दिली आहे.

शिवसेना-राष्ट्रवादीचा उत्पल पर्रिकरांना पाठिंबा 

उत्पल पर्रिकरांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता भाजपविरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून उत्पल पर्रिकरांना पाठिंबा देण्यात येणार आहे. उत्पल पर्रिकरांविरोधात कोणताही उमेदवार देणार नसल्याचे या दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आले आहे. शिवसेनेकडून उमदेवार जाहीर करण्यात आले असून पणजी मतदारसंघातून शैलेंद्र वेलिंगकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वेलिंगकर यांची उमेदवारी मागे घेण्यात येणार असल्याचे यापूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा : Goa Assembly Election 2022 : गोव्यातून शिवसेना दहा ते बारा जागा लढणार, संजय राऊतांची घोषणा