घरदेश-विदेशउत्तर प्रदेशात मोठा अपघात; रस्त्यावर उभ्या असलेल्या बसला ट्रकने धडकले, १८ जणांचा...

उत्तर प्रदेशात मोठा अपघात; रस्त्यावर उभ्या असलेल्या बसला ट्रकने धडकले, १८ जणांचा मृत्यू

Subscribe

उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथे मंगळवारी रात्री उशिरा मोठा अपघात झाला. बाराबंकी येथे रस्त्यावर उभी असलेल्या डबल डेकर बसला लखनौच्या दिशेने येत असलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. यावेळी बसला मोठी धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की या दुर्घटनेत जवळपास १८ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळतेय.तर २५ हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान मृतांची संख्या वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

ही घटना घडल्याचे समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना त्वरीत उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, बस अचानक ब्रेकडाऊन झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभी होती. पंजाबहून बिहारकडे जाणारी व्हॉल्वो बस प्रवाशांनी भरलेली होती. रामसनेही घाट पोलीस स्टेशन परिसरातील कल्याणी नदी महामार्गावर हा अपघात झाला. पीडित कुटुंबाच्या नातेवाईकासाठी २ लाख आणि जखमींना ५० रुपये नुकसान भरपाई देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

- Advertisement -

पंतप्रधानांकडून या अपघाताबद्दल शोक व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. यूपीच्या बाराबंकी येथे रस्ता अपघाताच्या बातमीने मला फार वाईट वाटले. बाराबंकी येथील रस्ता अपघाताच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलून अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी बाराबंकी जिल्हा प्रशासनाला पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत. यासह जखमींना रुग्णालयात तसेच इतर प्रवाशांनाही त्यांच्या गंतव्यस्थानी नेण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

- Advertisement -

लखनौच्या एडीजी सत्य नारायण सबत यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस ड्रायव्हरने बस दुरुस्त करताना प्रवाशांना विश्रांती घेण्यास सांगितले होते. थोड्याच वेळात एका ट्रकने बसला जोरदार धडक दिली, त्यात बरेच जखमी झाले. बसखाली अडकलेल्या मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य चालू आहे. तसेच जखमींवर उपचार करण्यात येत आहे. अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत दोष ट्रक चालकाचा असल्याचे सांगितले जात आहे.


India Corona Update: गेल्या २४ तासांत बाधितांसह मृतांच्या संख्येत वाढ; ४३,६५४ नवे रूग्ण, ६४० मृत्यू
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -