घरक्राइमउत्तर प्रदेश बेकायदा धर्मांतर प्रकरणाचे बीड कनेक्शन; UPATSकडून बीडमधील आरोपी इरफान शेखला...

उत्तर प्रदेश बेकायदा धर्मांतर प्रकरणाचे बीड कनेक्शन; UPATSकडून बीडमधील आरोपी इरफान शेखला अटक

Subscribe

उत्तर प्रदेश बेकायदा धर्मांतर प्रकरणाचे धागेदोरे थेट दहशतवादी संघटनांशी जुळत असतानाच आता यातील बीड कनेक्शन समोर आली आहे. या धर्मांतर प्रकरणी अटक केलेल्या तीन आरोपींपैकी इरफान शेख हा बीड जिल्ह्याचा असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यासोबतच आरोपी इरफान शेख केंद्र सरकारच्या बाल कल्याण मंत्रालयातील कर्मचारी असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश बेकायदा धर्मांतरण प्रकरणातील मोठे रॅकेट उघड झाले. त्यानंतर उत्तर प्रदेशचे एडीडी प्रशांत कुमारप यांनी पत्रकार परिषद घेत या रॅकेटचा खुलासा केला आणि रॅकेटमधून जवळपास १ हजार नागरिकांचे धर्मांतर करण्यात आल्याची माहिती दिली. याप्रकरणी दिल्लीतून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या बाल कल्याण मंत्रालयात काम करत होता आरोपी इरफान शेख

या धर्मांतरण रॅकेटमधील मुख्य आरोपी मुक्ती काझी जहांगीर आणि मोहम्मद उमर गौतम या दोघांना अटक करण्यात आली. या रॅकेटचे राष्ट्रीय स्तरासह मोठे जाळे असल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटले होते. तसेच आरोपी झाकीर नाईक आणि काही दहशतवादी नेत्यांशीही या दोन आरोपींचे संबंध असल्याचे एटीएसच्या तपासात उघड झाले आहे. त्यापाठोपाठ आता या प्रकरणी केंद्र सरकारच्या बाल कल्याण मंत्रालयात काम करणाऱ्या इरफान शेखलाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस चौकशीदरम्यान हा आरोपी मुळचा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी बेरोजगार, गरीब कुटुंब आणि मूकबधिर लोकांचा फायदा घेत बेकायदा धर्मांतरण करत होते. याप्रकरणी यूपी एटीएसने यापूर्वी दोन आरोपींना दिल्लीतून अटक केली आहे. या लोकांच्या परिस्थितीचा फायदा घेत त्यांना लाच देऊन त्यांचे धर्मांतरण करत होते. धक्कादायक बाब म्हणजे, या धर्मांतरणासाठी पाकिस्तानी दहशतवादी संघटना आयएसआय फंडिंग करत असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

तिसरा आरोपी बीडचा 

याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केलेला तिसरा आरोपी इरफान खान हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शिरसाळाचा आहे. तो सध्या दिल्लीत वास्तव्यास असून तो दिल्लीमधील केंद्र सरकारच्या बाल कल्याण मंत्रालयामध्ये इंटरप्रीटेटर म्हणून काम करत होता. मात्र इरफानला अवैध धर्मांतर प्रकरणांमध्ये युपी एटीएसनं ताब्यात घेतलेलं आहे. शिरसाळ मध्येच त्याचं प्राथमिक शिक्षण झालं असून सध्या तो प्रोफेसर असून दिल्लीत वास्तव्यास आहे, असं त्याच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आलं आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -