Elections 2022 Voting Live: गोव्यात ७८.९४ टक्के मतदानाची नोंद

uttar pradesh goa Uttarakhand assembly elections 2022 live updates 14 February

गोवा विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये एकूण ७८.९४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सर्वाधिक मतदान साखळी मतदारसंघात झाले आहे. साखळीत एकूण ८९.६४ टक्के मतदान करण्यात आले आहे. या मतदारसंघातून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत निवडणूक लढवत आहेत.


गोव्यात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ७५.२९ टक्के मतदानाची नोंद

वास्कोमध्ये सगळ्यात कमी ६७.६३ टक्के मतदानाची नोंद तर साखली मतदारसंघात सर्वाधिक ८८.०७ टक्के मतदान


उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत 60.31 टक्के मतदानाची नोंद

#UttarPradesh 60.31%
#Uttarakhand 59.37 %
#Goa 75.29%


उत्तराखंडमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५९.३७ टक्के मतदानाची नोंद


उत्तर प्रदेशमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत ५१.९३ टक्के मतदान


उत्तराखंडमध्ये १०० वर्षीय मतदार नारायण सिंहांनी केले मतदान

उत्तराखंडमधील कपकोट विधानसभा मतदारसंघात 100 वर्षांचे मतदार नारायण सिंह कपकोटी यांनी मतदान केले. त्यांना SVEEP स्वयंसेवकांनी बूथवर आणले आणि नंतर SDM कपकोट यांनी शाल देऊन त्यांचा सत्कार केला.


गोव्यातील साखळी मतदारसंघात सर्वाधिक ७० टक्के मतदानाची नोंद

गोव्यातील साखळी मतदारसंघातून भाजप नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत निवडणूक लढवत आहेत.


उत्तराखंडमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत ४९.२४ टक्के मतदान


दुपारी १ वाजेपर्यंत गोव्यात ४४.६३ टक्के मतदान, उत्तर प्रदेशमधील दुसऱ्या टप्प्यात ३९.०७ टक्के मतदान आणि उत्तराखंडमध्ये ३५.२१ टक्के मतदान झाले आहे.


काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी १६ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये प्रचार करणार. तर काँग्रेस नेते राहूल गांधी उद्या पटियाला, मानसा आणि बर्नाळामध्ये प्रचार करणार आहेत.


सकाळी ११ वाजेपर्यंत गोव्यात २६.६३ टक्के, उत्तर प्रदेशमध्ये २३.०३ टक्के, उत्तराखंडमध्ये १८.९७ टक्के मतदान झाले आहे.


माजी केंद्रीय शिक्षण मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी डेहराडूनमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला


उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांनी केलं मतदान


सकाळी ९ वाजपर्यंत गोव्यात ११.०४ टक्के, उत्तर प्रदेशमध्ये ९.४५ टक्के आणि उत्तराखंडमध्ये ५.१५ टक्के मतदान झाले.


गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी माईम विधानसभा मतदार संघातील बूथ क्रमांत ४२ येथे मतदान केले.


उत्तर प्रदेशचे मंत्री जितिन प्रसाद यांनी शहाजहानपूरमध्ये मतदान केले.


गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मतदान केलं.


केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी रामपूर मतदान केंद्रावर मतदान केले.


उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि खतिमा विधानसभेच्या जागेवरचे भाजप उमेदवार पुष्कर सिंह धामी यांनी मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतदान केले.


गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांनी पणजीतील मतदान केंद्रांना भेट दिली. या मतदारसंघात उत्पल पर्रीकर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.


हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी वास्को द गामा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक ७ वर मतदान केले.


उत्तराखंडमध्ये मतदानाला सुरुवात


बरेलीमध्ये जिल्ह्यात सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मतदान करण्यासाठी लोकांचा उत्साह स्पष्ट दिसत होता. लोक वेळेपूर्वीच मतदान केंद्रावर पोहोचले, मात्र काही ठिकाणी यंत्रातील बिघाडामुळे प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही. उपस्थित अधिकाऱ्यांनी संबंधित सेक्टर मॅजिस्ट्रेटकडे याबाबतची माहिती पाठवली. मशिन बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे.


गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी पत्नीसह तळेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक १५वर मतदान केले.


उत्तर प्रदेशातील दुसऱ्या टप्प्यातील आणि गोव्यातील पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होणार आहे. तसेच उत्तराखंडमध्ये मतदानाला सुरुवात सकाळी ८ वाजल्यापासून होणार आहे. उत्तर प्रदेशच्या ५५ जागा, उत्तराखंडच्या ७० आणि गोव्याच्या ४० जागांवर मतदान आज होणार आहे.

देशातील सर्वात लहान राज्य असलेल्या गोव्यातील ४० जागांसाठी ३०१ उमेदवारांचे भवितव्य ११ लाख ६४ हजार ५२२ मतदारांच्या हाती आहे. उत्तराखंडमधील ७० जागांसाठी चुरशीची लढत होत आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये दुसर्‍या टप्प्यात ५५ जागांसाठी ५८६ मतदारांचे भवितव्य २कोटींहून अधिक मतदारांच्या हाती आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोव्यात आजच्या मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करून मतदानाचा नवा रेकॉर्ड करा, असे म्हणाले.