घरताज्या घडामोडीयोगी आदित्यनाथ सरकार 2.0 हॅकर्सच्या निशाण्यावर, CM कार्यालयानंतर आणखी २ सरकारी ट्विटर...

योगी आदित्यनाथ सरकार 2.0 हॅकर्सच्या निशाण्यावर, CM कार्यालयानंतर आणखी २ सरकारी ट्विटर अकाउंट हॅक

Subscribe

देशात वाढत्या इंटरनेटच्या वापरामुळे सरकारी कामकाजातसुद्धा इंटरनेटचा मोठा वापर करण्यात येत आहे. परंतु यामुळे धोकाही वाढला आहे. सोशल मीडिया हॅक होण्याचे प्रमाणसुद्धा अधिक वाढले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर हँडल हॅक केल्याच्या ४८ तासानंतर हॅकर्सने उत्तर प्रदेश सरकारच्या २ कार्यालयांचे ट्विटर हँडल हॅक करण्यात आले आहे. या घटनेमुळे शासन आणि प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर हँडल हॅक करण्यात आले होते. या घटनेला ४८ तास पूर्ण होताच यूपी सरकारचे ट्विटर हँडल हॅक करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास यूपी सरकारमधील २ कार्यालयांच्या अधिकृत ट्विटर हँडलला हॅक करण्यात आले आहे.

- Advertisement -

हॅकर्सकडून उत्तर प्रदेश सरकारचे @UPGovt हे ट्विटर हँडल हॅक करण्यात आले आहे. हॅक केल्यानंतर हॅकर्सनी यूपी सरकारचे ट्विटर हँडल बदलले तसेच हजारो ट्विटही केले. सायबर तज्ज्ञांच्या पथकाने खाते जप्त केले आहे.

- Advertisement -

उत्तर प्रदेश सरकारच्या ट्विटर हँडलवरुन हॅकर्सने केलेले ट्विट सायबर एक्सपर्ट हटवत आहेत. या प्रकरणी पोलीस एफआयआर नोंदवणार असल्याचे माहिती मिळत आहे. तसेच आतापर्यंत पोलिसांना हॅकरची कोणतीही माहिती मिळाली नाही आहे. तसचे यूपी सरकारसोबत उत्तर प्रदेश सरकार सूचना विभागाच्या फॅक्ट चेक आणि काँग्रेसचे ट्विटर हँडलसुद्धा हॅक करण्यात आले आहे.

हॅकर्सने उत्तर प्रदेश सरकारचे ट्विटर हँडल हॅक केल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रोफाईल फोटो बदलून दूसरा फोटो लावला तसेच उत्तर प्रदेश मुख्यमंत्री च्या जागी @BoredApeYC @YugaLabs लिहिले होते. या घटनेनंतर लगेच सायबर एक्सपर्टची मदत घेण्यात आली आणि ट्विटर हँडल सुरक्षित करण्यात आले. हॅकर्सनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून 50 हजारांहून अधिक ट्विट केले होते. जे नंतर हटवण्यात सायबर विभागाकडून हटवण्यात आले.


हेही वाचा : INS Vikrant Scam: ‘ती’ रक्कम कुठे गेली हे शोधण्यासाठी सोमय्या पिता-पुत्रांची कोठडीची मागणी – वकील प्रदीप घरत

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -