घरताज्या घडामोडीCorona Vaccine : आता 'या' राज्यातही फुकटात कोरोनाची लस!

Corona Vaccine : आता ‘या’ राज्यातही फुकटात कोरोनाची लस!

Subscribe

बिहार, मध्य प्रदेश आणि तमिळनाडूनंतर आता उत्तर प्रदेश सरकारने देखील कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशमधल्या सर्व नागरिकांना ही लस जेव्हा येईल, तेव्हा मोफत दिली जाईल, असं वृत्त न्यूज १८नं दिलं आहे. उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह यांनी यासंदर्भातली घोषणा केली असून पुढच्या वर्षी मार्चपर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले आहेत. ‘कोविड १९ला आळा घालण्यासाठीचे आमचे प्रयत्न कायम सुरूच राहतील. कोरोनाकाळात आम्ही एक टीम म्हणून काम केलं. आणि निकाल तुम्हा सगळ्यांसमोर आहेत.’ अजूनपर्यंत कोरोनाची लस नेमकी कधी येणार, याविषयी खात्रीशीर दावा कोणत्याही संस्थेने केलेला नसताना भारतात मात्र, तीन राज्यांनी कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याची घोषणा केली आहे.

आत्तापर्यंत ४ राज्यांमध्ये मोफत लसीची घोषणा!

भाजपने बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक जिंकून आल्यानंतर कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा केल्यानंतर त्यावरून काँग्रेस आणि देशातील विरोधी पक्षाने तीव्र आक्षेप घेतला होता. कोरोनासारख्या भीषण रोगावरून राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून भाजपवर करण्यात आला होता. भाजपच्या जाहीरनाम्यात देखील कोरोनाच्या लसीचा समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बिहारनंतर तमिळनाडू आणि मध्य प्रदेशने देखील कोरोनाची लस आल्यानंतर ती राज्यातल्या रहिवाशांना मोफत देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता उत्तर प्रदेशने देखील अशीच घोषणा केली आहे.

- Advertisement -

जगभरात ७० हून अधिक संस्था कोरोनाच्या लसीवर संशोधन केलं जात आहे. यामध्ये ऑक्सफोर्ड आणि भारतातील सिरम इन्स्टिट्युटकडून संयुक्तपणे बनवलेल्या लसीकडून भारतीयांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्याशिवाय भारतातल्या बायोटेक कंपनीकडून देखील कोरोनाच्या लसीवर संशोधन सुरू आहे. मात्र, या लसी अद्याप चाचणी स्तरावरच असून त्यात यशस्वी झाल्यास त्यांना मान्यता मिळू शकणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -