Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश क्लासला जाणाऱ्या दहावीच्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार करत हत्या

क्लासला जाणाऱ्या दहावीच्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार करत हत्या

Related Story

- Advertisement -

क्लासला जाणाऱ्या दहावीच्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेश मेरठ जिल्ह्यातील सरधना गावात घडली आहे. चार तरुणांनी पीडित विद्यार्थीनीचे अपहरण करत पडीक घरात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यात पीडित विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मृत विद्यार्थीनीच्या कुटुंबियांनी गावातील चार तरुणांविरोधात सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मात्र या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

अटक होण्याचे भीतीने आरोपींनी मुलीला विष पाजले. यामुळेच तिचा मृत्यू झाला. असा आरोप विद्यार्थीनीच्या कुटुंबियांनी केला आहे. तसेच मुलीच्या अंगावरील कपडे फाडले होते. ती कशीबस घर गाठत घडलेल्या घटनेची माहिती दिली. हे ऐकून कुटुंबियांना धक्का बसला. दरम्यान तिची प्रकृती बिकट झाल्याने कुटुंबियांनी तिला तात्काळ रुग्णालयात भर्ती केले. मात्र उपाचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक देहात केशव मिश्रा आणि पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच घडलेल्या घटनेची अधिक माहिती घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे तर अन्य दोघांचा शोध सुरु आहे.

१५ वर्षीय विद्यार्थीनी दहावी इयत्तेत शिकत होती. दरम्यान गुरुवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास ती गावात क्लासमध्ये जात होती. यावेळी गावातील लाखन आणि अन्य तिघांनी तिचे भर रस्त्यातून अपहरण केले. यानंतर गावाबाहेरील एका पडक्या घरात नेऊन चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.


- Advertisement -

 

- Advertisement -