घरताज्या घडामोडीधक्कादायक! विवाहित महिलेवर रेशन दुकानदाराने केला बलात्कार!

धक्कादायक! विवाहित महिलेवर रेशन दुकानदाराने केला बलात्कार!

Subscribe

सध्या देश कोरोना व्हायरसच्या संकटाशी सामना करत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनेक उपयायोजना करत आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केला असल्यामुळे यादरम्यान केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मोफन रेशनची सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत.  एकीकडे या संकटाचा सामना करत असताना दुसरीकडे मात्र अजूनही धक्कादायक घटना समोर येत आहे. उत्तर प्रदेशातील शामली येथील एका २३ वर्षीय विवाहित महिलेवर रेशन दुकानदारने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. सरकारी आदेशानुसार दुकानदारने मोफन रेशन देण्याचे तिला आश्वासन दिले होते.

पोलिसांच्या महितीनुसार, लॉकडाऊनमुळे तिचा पती पंजाबमध्ये अकडलेला आहे. त्यामुळे रेशन घरी पोचवण्याची तिने दुकानदाराला विनंती केली होती. त्यानंतर मंगळवारी आरोपीने घरी रेशन देण्याऐवजी तिच्यावर बलात्कार केला, असा महिलेने आरोप केला आहे.

- Advertisement -

शामलीचे पोलीस अधीक्षक विनीत जयस्वाल म्हणाले, पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनुसार आरोप विरोधात आयपीसीच्या कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला आता अटक करण्यात आली आहे.

दरम्यान पीडितेच्या घरमालकाने असं सांगितलं की, गेल्या तीन आठवड्यांपासून आम्ही तिचा नवरा दूर असल्यामुळे जेवण देत होता. तिच्याकडे पैसे देखील नव्हते. पण काही दिवसांनंतर आमची परिस्थिती खराब झाल्याने आम्ही जेवण देणे बंद केले.

- Advertisement -

पीडितेचा पती एक मजूर असून तो त्याचा पगार घेण्यासाठी पंजाबला गेला. पण देशभरात लॉकडाऊन जाहीर तो पंजाबमध्येच अडकला.


हेही वाचा – Lockdown : घरभाडे थकले म्हणून कुणालाही घराबाहेर काढू नका, राज्य सरकारच्या सूचना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -