घरक्राइमयूपीत नराधमांचा हैदोस; हाथरस नंतर बलरामपूर, भदोही येथेही बलात्कार

यूपीत नराधमांचा हैदोस; हाथरस नंतर बलरामपूर, भदोही येथेही बलात्कार

Subscribe

उत्तर प्रदेशमधील बलात्काराचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाही आहे. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरुन गेला असताना राज्यातील भदोही शहरात अुनसूचित जातीतल्या मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घुण हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे. अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे, असं प्रथमदर्शनी दिसतंय, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

भदोहीमधील गोपीगंज परीसरातल्या राजा राम तिवारीपूर भागात ही घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीच्या डोक्यावर प्रहार करून तिची हत्या करण्यात आली असून तिचा मृतदेह बाजरीच्या शेतात आढळून आला आहे. गुरुवारी दुपारी या मुलीचा मृतदेह सापडला. मुलीचं शीर छिन्न-विछिन्न अवस्थेत सापडलं असून अत्यंत निर्घृणपणे तिची हत्या करण्यात आली आहे.

- Advertisement -

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षकांनी घटनास्थळी धाव घेत मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अधिक माहिती देता येईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, प्राथमिकदृष्ट्या बलात्कार केल्यानंतर मुलीची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील अनसूचित जातीतील पीडित मुलीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी दिलेल्या वागणूकीवर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. २९ सप्टेंबरला दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयात पीडित मुलीने अखेरचा श्वास घेतला. यानंतर अर्ध्यारात्रीच पोलिसांनी कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय आणि उपस्थितीशिवाय पीडित मुलीच्या मृतदेहावर पोलिसांनी अंत्यसंस्कार उरकून घेतले.

- Advertisement -

बलरामपूर बलात्कार प्रकरण

हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरण ताजं असतानाच उत्तर प्रदेशमधील बलरामपूरमध्ये आणखी एका २२ वर्षीय दलित विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या पीडिती मुलीवरही हाथरस प्रकरणाप्रमाणे घाईघाईने अंत्यसंस्कार उरकण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बुलंदशहर बलात्कार प्रकरण

उत्तर प्रदेशमधील बुलंद शहरात एका अल्पवयीन तरुणीनं आपल्या एका शेजाऱ्यावर नशेचा पदार्थ देऊन बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तक्रार केली तर अॅसिड फेकण्याची धमकी आरोपीने दिली, असं पीडित मुलीने सांगितलं. पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

आझमगड बलात्कार प्रकरण

उत्तर प्रदेशच्याच आझमगढमध्ये एका तरुणाने आठ वर्षांच्या एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. अल्पवयीन मुलगी घरासमोर खेळत असताना तरुणानं तिला घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीने आपल्या कुटुंबीयांना याबद्दल सांगितल्यानंतर घटना उघडकीस आली. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -