घरदेश-विदेशउत्तराखंडमध्ये त्रिशूल माऊंटवर हिमस्खलन, गिर्यारोहणादरम्यान मुंबईतील पाच जणं बेपत्ता

उत्तराखंडमध्ये त्रिशूल माऊंटवर हिमस्खलन, गिर्यारोहणादरम्यान मुंबईतील पाच जणं बेपत्ता

Subscribe

उत्तराखंडच्या बागेश्वर जिल्ह्यातील त्रिशूल पर्वतावर चढत असताना हिमस्खलनामुळे भारतीय नौदलाचे पाच गिर्यारोहक आणि एक कुली बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. गिर्यारोहकांच्या शोधात उत्तरकाशी येथील नेहरू पर्वतारोहण संस्थेचे एक बचाव पथक प्राचार्य कर्नल अमित बिष्ट यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी रवाना झाले आहे. धक्कादायक म्हणजे या दुर्घटनेत मुंबईतील ५ गिर्यारोहक गिर्यारोहणासाठी या पर्वतावर गेले होते. त्रिशुल माऊंटवर गिर्यारोहण करत असताना हिमस्खलन झाले आणि मुंबईतील पाच जणं बेपत्ता झाले. या हिमस्खलनात भारतीय नौदलाचे १० जवान बेपत्ता झाले असून सध्या त्यांची शोध मोहीम वेगाने सुरू आहे. गिर्यारोहण करण्यासाठी माऊंट त्रिशूलवर २० जवान जात असताना हा अपघात घडला.

भारतीय नौदलाच्या जवानांनी शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मदत आणि बचावासाठी एनआयएमच्या शोध आणि बचाव पथकाची मदत मागितली असल्याचे प्राचार्य कर्नल अमित बिष्ट यांनी सांगितले. मदत मागताच रेस्क्यू ऑपरेशन टीम उत्तरकाशीहून माऊंट त्रिशूलच्या दिशेनं रवाना झाली आहे. टीम जोशीमठला पोहोचली आहे पण खराब हवामानामुळे पुढे जाणे शक्य नाही. हवामानात सुधारणा होताच मदतकार्य सुरू केले जाईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली. एनआयएमच्या मते, लष्कर, हवाई दल आणि राज्य आपत्ती दलाची बचाव पथके आणि हेलिकॉप्टरही या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, कुमाऊंमधील बागेश्वर जिल्ह्यातील चमोली जिल्ह्याच्या सीमेवर माऊंट त्रिशूल असलेल्या ठिकाणी नौसेनेच्या २० जणांची टीम साधारण ७ हजार १२० मीटर उंच माऊंट त्रिशूलवर गिर्यारोहणासाठी गेले होते. दरम्यान शुक्रवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास टीमने शिखर सर करण्यासाठी सुरूवात केली. या दरम्यान, हिमस्खलन झाल्याने नौदलाचे ५ जवानांसह गिर्यारोहक आणि एक कुली बेपत्ता झाले आहेत.


राजीव गांधींच्या रक्ताने माखलेली कॅप घालत पोलीस अधिकारी निवृत्त

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -