Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर क्राइम उत्तराखंडमध्ये पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये राडा; भाजपा पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यू

उत्तराखंडमध्ये पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये राडा; भाजपा पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यू

Subscribe

उत्तराखंडमध्ये 50 हजारांचे इनाम असलेल्या वॉन्टेड गुन्हेगाराला पकडताना पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात भाजपा ब्लॉक प्रमुख गुरताज भुल्लर यांच्या पत्नीचा गोळी लागून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

उत्तराखंडमध्ये 50 हजारांचे इनाम असलेल्या वॉन्टेड गुन्हेगाराला पकडताना पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात भाजपा ब्लॉक प्रमुख गुरताज भुल्लर यांच्या पत्नीचा गोळी लागून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय, या चकमकीत SHO सह 5 पोलीसांपैकी दोघांना गोळी लागल्याने जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. (Uttarakhand Bharatpur village BJP Leader wife shot dead in clash between UP Police)

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश पोलिस दल आणि गावकऱ्यांमध्ये हाणामारी झाली. 50 हजारांचे इनाम असलेल्या खाण माफियाला पकडण्यासाठी उत्तराखंडच्या काशीपूरच्या कुंडा गावात यूपी पोलीस त्याचा पाठलाग करत होते. खाण माफियाचा पाठलाग करताना माफिया जफरने उत्तराखंड सीमा ओलांडून जसपूरमध्ये प्रवेश केला.

- Advertisement -

त्यावेळी जफर आणि त्याच्या साथीदारांनी पोलीस पथकावर गोळीबार सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात ब्लॉक प्रमुख गुरताज भुल्लर यांची पत्नी गुरप्रीत कौर यांना गोळी लागली. गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, महिलेच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी पोलिसांवर हल्ला चढवला आणि त्यांना ओलीस ठेवले.

याप्रकरणी अधिक तपास केला असता, पोलिसांना ओलीस ठेवल्याची माहिती मिळताच मुरादाबाद रेंजचे DIG शलभ माथूर, SSP हेमंत कुतियाल, SPRA संदीप मीना घटनास्थळी पोहोचले. अनेक पोलिस ठाण्यांच्या पोलिस फौजफाट्याबरोबरच राखीव पोलीस दलही तेथे तैनात करण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांच्या छाप्यादरम्यान, पोलिस आणि जसपूर भाजपा ब्लॉक प्रमुख गुरताज भुल्लर यांच्या कुटुंबामध्ये झटापट झाली. त्यानंतर गोळीबार झाला आणि एक गोळी ब्लॉक प्रमुखाच्या पत्नीलाही लागली. त्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाला. यानंतर गावकऱ्यांनी पोलीस पथकाला घेराव घातला आणि दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला.


हेही वाचा – राजीनाम्यावरून खटके, उमेदवारी लटके

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -