Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Uttarkashi Cloud Burst: उत्तरकाशीमध्ये ढगफुटीने हाहाकार; तिघांचा मृत्यू, तर चार जण बेपत्ता

Uttarkashi Cloud Burst: उत्तरकाशीमध्ये ढगफुटीने हाहाकार; तिघांचा मृत्यू, तर चार जण बेपत्ता

Related Story

- Advertisement -

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये ढगफुटीने हाहाकार उडाला आहे. या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन महिलांसह चार जण बेपत्ता झाले आहेत. उत्तरकाशीतील मांडो गावात रविवारी रात्री ही दुर्घटना घडली. अचानक झालेल्या या अतिमुसळधार पावसामुळे गावात प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे एनडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तर इतर एनडीआरएफच्या अतिरिक्त तुकड्याही अलर्टवर ठेवण्यात आल्या आहे. अद्यापही या ठिकाणी बचाव कार्य सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मांडो गावात ढगफुटीच्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या लोकांमध्ये एक पुरुष आणि एका मुलाचा समावेश आहे. त्यामुळे अद्याप काही लोकं मलब्याखाली अडकल्याच्या भीतीने बचाव दलाकडून नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. ढगफुटीनंतर अलकनंदा, मंदाकिनी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय.

- Advertisement -

एसडीआरएफ टीमचे प्रभारी जगदंगा प्रसाद यांनी सांगितले की ” मांडो गावात ढगफुटीमुळे झालेल्या दुर्घटनेत चार लोक बेपत्ता झाले आहेत, तर तीन लोकांचा मृत्यू झाला आहे.” डोंगराळ भागात मुसळधार पावसामुळे पावसाळ्य़ात वाहणाऱ्या नद्या दुथडी भरून वाहतात. यात नद्यांच्या पाण्याची पातळी अनेक फुटांनी वाढतेय. यात उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांत ढगफुटीच्या बर्‍याच घटना समोर आल्या असून त्यामध्ये बऱ्याच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे उत्तराखंड प्रशासनाने स्थानिक नागरिकांना आणि इतर पर्यटकांना मुसळधार पावसात नद्यांजवळ जाऊ नये असे आवाहन केले आहे.


- Advertisement -

 

- Advertisement -