घरAssembly Battle 2022Uttarakhand CM 2022 : पुष्कर सिंह धामीच पुन्हा उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदी होणार विराजमान

Uttarakhand CM 2022 : पुष्कर सिंह धामीच पुन्हा उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदी होणार विराजमान

Subscribe

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार स्थापनेसाठी मुख्यमंत्री पदाच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र पुष्कर सिंह धामीच पुन्हा उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहे. त्यामुळे उत्तराखंडमधील मुख्यमंत्री पदावरून सुरु असलेल्या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. नुकतीच देहराडून येथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सह निरीक्षक मीनाक्षी लेखी उपस्थित होत्या. याचवेळी मुख्यमंत्री पदासाठी पुष्कर सिंह धामी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर झालेय, यानंतर जवळपास 11 दिवसांनी राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांची घोषणा करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री पदासाठी आपल्या नावाची घोषणा होताच पुष्कर सिंह धामी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या प्रगतीसाठी काम करणार आहे. तसेच उत्तराखंडला देशातील सर्वोत्तम राज्य बनवणार असल्याचे धामी यांनी सांगितले.

- Advertisement -

केवळ सहा महिन्यातच धामी यांनी उत्तराखंडच्या जनतेच्या मनात आपली छाप सोडली. ज्यामुळे पक्षातचा विजय निश्चित मानला जात होता. खतीमा यांच्याकडून पराभव होऊनही पुष्कर सिंह धामी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. दुसरीकडे चौबत्ताखलचे आमदार सतपाल महाराज, श्रीनगरचे आमदार धनसिंग रावत आणि राज्यसभा सदस्य अनिल बलुनी हेही या पदाच्या दावेदारांमध्ये होते. एवढेच नाही तर रविवारी दिल्लीत भाजप हायकमांडशिवाय पीएम मोदींनी राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल विचारमंथन केले होते.

- Advertisement -

2022 च्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भाजपने 47 जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. राज्याच्या स्थापनेनंतर सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्यात यश आले आहे. यातून राज्यात दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याचा समज भाजपने मोडीत काढल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर हरीश रावत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 19 जागा जिंकल्या आहेत. याशिवाय बसपाने दोन तर अपक्षांनी दोन जागांवर विजय मिळवला आहे. खतीमाचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्या पराभवामुळे हे प्रकरण गुंतागुंतीचे झाले असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पुन्हा एकदा धामी यांच्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवत विश्वास व्यक्त केला आहे.


Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा आलेख घसरला; 99 नवे रुग्ण, 180 रुग्ण कोरोनामुक्त


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -