Uttarakhand Election Result 2022 : उत्तराखंडमध्ये भाजपचा बहुमताकडे कल; जाणून घ्या किती जागांवर कोण पुढे?

uttarakhand election result 2022 bjp gets majority in uttarakhand assembly early trends pushkar singh dhami harish rawat
Uttarakhand Election Result 2022 : उत्तराखंडमध्ये भाजपचा बहुमताकडे कल; जाणून घ्या किती जागांवर कोण पुढे?

देशातील उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांटा निकाल जाहीर होत आहे. मतदारांनी कोणाच्या पारड्यात जनमताचा कौल दिला हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे. दरम्यान तुलनेने लहान असलेल्या उत्तराखंड हे राज्य राजकीयदृष्ट्या फार महत्त्वाचे राज्य मानले जाते. 70 जागांवर काँग्रेस आणि भाजपा यांच्यात चुरशीची लढाई पाहायला मिळत आहेत. उत्तराखंडमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 36 जागा जिंकत बहुमताचा आकडा गाठता येईल. सध्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकांच्या निकालांचा सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. सध्या भाजपला उत्तरखंडमध्ये 36 जागांवर तर काँग्रेसला 26 जागांवर आघाडीवर आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये दोन्ही पक्षांमध्ये 10 जागांचा फरक आहे. गुरुवारी सकाळी 8 वाजता राज्यातील 70 विधानसभा जागांवर मोतमोजणी सुरु झाली आहे.

उत्तराखंडमध्ये खतीमामधून भाजपाचे पुष्कर सिंह धामी, लाल कुआंमधून काँग्रेसचे हरीश रावत , चौबतामधून भाजपचे सतपाल महाराज, गंगोत्रीमधून आम आम आदमी पार्टीचे कर्नल अजय कोंथियाल आणि सितारगंजमधून भाजपचे सौरभ बहुगुणा हे प्रमुख चेहरे आहेत.

एकूण या ट्रेंडवर आज काँग्रेसचे नेते हरीश रावत म्हणाले की, काँग्रेस निवडणूक निकालाच्या नव्या सकाळसाठी आणि येणाऱ्या सकाळसाठी सज्ज आहे. सरकारमध्ये येण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर ते म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षांचा आशीर्वाद ज्याच्यावर असेल आम्ही त्याच्यासोबत राहू.

एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, उत्तराखंडमध्ये काँग्रेसला बहुमत मिळू शकते. निकालापूर्वी अनेक एक्झिट पोलमध्ये मात्र डोंगराळ भागातील जिल्ह्यांबाबत साशंक आहेत, म्हणजेच सरकार कोण स्थापन करणार हे स्पष्टपणे ठरवता आले नाही. एक्झिट पोलच्या निकालांबद्दल बोलायचे झाले तर काँग्रेसला 32-38 तर भाजपला 26-32 जागांवर विजय मिळू शकतो असा अंदाज आहे.

त्याचबरोबर या कार्यकाळात भाजपने 3 मुख्यमंत्री बदलले आहेत. याबाबत काँग्रेसनेही भाजपला घेरले. आता या 2022 च्या निवडणुकीत काँग्रेस भाजपला कडवी टक्कर देत आहे.

2017 बद्दल बोलायचे झाले तर 70 जागांच्या उत्तराखंड विधानसभेत भाजपला 57 जागा मिळाल्या. त्याच काँग्रेसला 11 जागांवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे यावेळी  जर काँग्रेसला बहुमत मिळाले तर काँग्रेससाठी ही मोठी गोष्ट ठरेल.

सध्या उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असून पुष्कर सिंह धामी हे मुख्यमंत्री आहेत. भाजपने 53 जागांसह बहुमत सिद्ध केले आहे. तर, 9 जागांसह काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे. परंतु काँग्रेसच्या एकूणच कारकिर्दीसाठी ही निवडणुक महत्वाची मानली जाते कारण हरीश रावत यांनी या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यास राजकारणातून सन्यास घेणार असल्याचे जाहीर केले आहे.


Assembly Election results 2022 : निकालाआधीच कुठे फुलांची सजावट, कुठे लाडू तर कुठे जिलेबीची तयारी