घरदेश-विदेशउत्तराखंडात पावसाचे २६ बळी ,अनेक नद्यांना पूर

उत्तराखंडात पावसाचे २६ बळी ,अनेक नद्यांना पूर

Subscribe

केरळनंतर परतीच्या पावसाने उत्तराखंडात मोठा धुमाकूळ घातला आहे. गेले तीन दिवस कोसळणार्‍या पावसामुळे उत्तराखंडात अनेक ठिकाणी पूर आला आहे. या पावसामुळे मंगळवारपर्यंत एकूण २६ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती उत्तराखंडच्या प्रशासनाने दिली आहे. नदीला पूर आल्यामुळे बांधकाम सुरू असलेला संपूर्ण पूलच वाहून गेला आहे. तर चंपावत जिल्ह्यात एक घर कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तराखंडमध्ये अनेक भागांमध्ये होत असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी पर्यटक अडकल्याचे सांगण्यात येतेय. एसडीआरएफ आणि उत्तराखंड पोलिसांनी जानकी चट्टी येथून भाविकांना रात्री उशिरा सुरक्षित गौरीकुंडमध्ये पोहोचवण्यात आले. केदारनाथचे दर्शन घेऊन परतत असताना हे भाविक अडकले होते. पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढला होता. गौरीकुंड-केदारनाथ पायी मार्गावर मंदाकिनी नदीच्या पलिकडे अडकलेल्या अनेक भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. मुसळधार पावसात एसडीआरएफने आतापर्यंत २२ भाविकांना वाचवले आहे. चारधाम यात्राही स्थगित करण्यात आली आहे.

- Advertisement -

उत्तराखंडमध्ये मदत आणि बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या १० टीम तैनात करण्यात आल्या आहेत. उत्तराखंडच्या ७ जिल्ह्यांमध्ये या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. डेहराडून, अल्मोडा, पिथोरागढ, हरिद्वार यांच्यासह इतर जिल्ह्यांमध्ये या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच केदारनाथच्या दर्शनासाठी गेलेल्या ४ हजार भाविकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या भाविकांना सहकार्य करण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -