पूर आलेल्या नदीत कोसळली पर्यटकांची कार, नऊ जणांना जलसमाधी

नदीला पूर आल्याने प्रवाह मोठ्याप्रमाणात होता. त्यामुळे पुलावरून गाडी खाली कोसळली. अखेर यातील नऊ पर्यटकांना जलसमाधी मिळाली.

उत्तराखंडच्या रामनगर (Uttarakhand Ramnagar) येथे शुक्रवारी सकाळीच मोठी घटना घडली आहे. पर्यटकांची कार पुलावरून ढेला नदीत कोसळली. या अपघातात कारमधील १० प्रवासी पुराच्या प्रवाहात वाहून गेले. यापैकी नऊ जणांना जलसमाधी मिळाली असून एका मुलीला वाचवण्यात एसडीआरएफ आणि पोलीस प्रशासनाला यश आले आहे. (Uttarakhand ramnagar a car full of tourists overturned in ramnagar dhela river tourists to have flow)

हेही वाचा  – कर्नाटक : कारवार समुद्राध्ये बोट बुडून सहा जणांना जलसमाधी

रामनगरच्या कोटद्वार रोड येथे असलेले कॉर्बेट नॅशनल पार्कच्या ढेला झोनमध्ये हा अपघात घडला. पंजाबमधील १० पर्यटक आर्टिगा गाडीने उत्तराखंड येथे पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी गेले होते. दरम्यान, आज शुक्रवारी सकाळी पाच वाजता त्यांची कार रामनगरच्या ढेला नदीजवळ पोहोचली. तुफान पाऊस असल्याने नदी दुथडी भरून वाहत होती. त्यामुळे पुलावरूनही पाणी गेले होते. पुलावरून पाणी गेल्यानंतरही कारचालकाने त्या पुलावरून गाडी नेली.

हेही वाचा – उत्तराखंडातील गंगोलीहाट येथे सापडली ही महाकाय गुहा ; गुहेत शेषनागासह अनेक देवी-देवतांचे चित्र

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार पुलावरून पाणी गेल्याने तिथून गाडी न नेण्याचा इशारा त्यांना देण्यात आला होता. पण, चालकाने ऐकलं नाही. वाहत्या प्रवाहातही चालकाने पुलावरून गाडी नेली. नदीला पूर आल्याने प्रवाह मोठ्याप्रमाणात होता. त्यामुळे पुलावरून गाडी खाली कोसळली. अखेर यातील नऊ पर्यटकांना जलसमाधी मिळाली.

हेही वाचा – जलसमाधीमुळे प्रशासन धस्तावले

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली. पुलावरून गाडी वाहून जात ती पुलाखाली अडकली, त्यामुळे त्यातील प्रवासी पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत गेले. ही माहिती तत्काळ आजूबाजूच्या परिसरात पसरल्याने बचावकार्य तेजीने सुरु करण्यात आले. बचावकार्य करताना एसडीआरएफला एका मुलीला वाचवण्यात यश आलं, पण तिच्यासोबत असलेल्या ९ जणांचा मृत्यू झाला आहे.