घर देश-विदेश Rain Update : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 'या' राज्याला पुन्हा पावसाचा रेड अलर्ट

Rain Update : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ‘या’ राज्याला पुन्हा पावसाचा रेड अलर्ट

Subscribe

उत्तराखंडमध्ये पावसाने आधीच हाहाःकार माजवलेला असताना आता पुन्हा एकदा या राज्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना हवामान खात्याकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी पावसाने देशातील अनेक राज्यांमध्ये धुमाकूळ घातलेला आहे. त्यामुळे अतिवृष्टीने देशातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्तराखंडमध्ये तर पावसाने मोठे नुकसान केले आहे. या राज्यातील अनेक गावच्या-गावं पुरात वाहून गेली आहेत. उत्तराखंडमध्ये पावसाने आधीच हाहाकार माजवलेला असताना आता पुन्हा एकदा या राज्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना हवामान खात्याकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दिल्लीमध्ये देखील 13 आणि 14 ऑगस्टला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. (Uttarakhand state has been issued a red alert for rain by the Meteorological Department)

हेही वाचा – Independence Day : 186 कैद्यांची स्वातंत्र्यदिनी कारागृहातून होणार सुटका

- Advertisement -

हवामान खात्याकडून उत्तराखंडमधील सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज आणि रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. डेहराडून येथे आजपासून (ता. 12 ऑगस्ट) ते 14 आगस्टपर्यंक मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. मागच्याच महिन्यात कुलू मनाली आणि डेहराडूनमध्ये पावासाने मोठी हानी केली होती. येथील गावांमध्ये पूर आल्याने सर्वच काही नष्ट झालेले आहे.

याशिवाय, राजस्थानमध्ये 15 ऑगस्टनंतरच पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मध्यप्रदेशात येत्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने आता हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार राज्यात 14 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता नाही. मात्र, या दिवसांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या रिमझिम सरी पडण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्टनंतरच राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होईल, असा विश्वास हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 15 ऑगस्टपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून पंजाब आणि हरियाणामध्ये सुद्धा रविवारी पाऊस पडू शकतो. तर, पश्चिम उत्तर प्रदेशात उद्या (ता. 13 ऑगस्ट) आणि 14 ऑगस्टला पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व उत्तर प्रदेशात शुक्रवार ते रविवार आणि जम्मूमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे IMD कडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे हवामान खात्याने आज (ता. 12 ऑगस्ट) बिहारमधील 9 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ज्या 9 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, तेथील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन देखील करण्यात आले आहे. तसेच, झारखंडमध्ये पुढील चार पाऊस नसण्याची माहिती देण्यात आली आहे. तर, गुजरात, विदर्भ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात थोड्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे.

- Advertisment -