घरदेश-विदेशUttarakhand Tunnel Collapse: 'मी ठीक आहे आई', बोगद्यात अडकलेल्या मजुराचे शब्द ऐकून...

Uttarakhand Tunnel Collapse: ‘मी ठीक आहे आई’, बोगद्यात अडकलेल्या मजुराचे शब्द ऐकून बचाव पथकाचे पाणावले डोळे

Subscribe

उत्तराखंडमध्ये सिलक्यरा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्यासाठी बचावकार्य तीव्र करण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये एक कामगार आपल्या आईला सांगतोय की, मी ठीक आहे, काळजी करू नको. त्याचे हे शब्द ऐकल्यानंतर बचाव कार्य करणाऱ्या टीमचे डोळे पाणावले. 

Uttarakhand Tunnel Collapse: उत्तराखंडमध्ये सिलक्यरा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्यासाठी बचावकार्य तीव्र करण्यात आले आहे. मंगळवारी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. आज बचाव पथकाला मोठे यश मिळाले आहे. आता कामगारांना अन्नही पोहोचवले जात आहे तर दुसरीकडे कामगारांचा पहिला व्हिडिओही समोर आला आहे. (Uttarakhand Tunnel Collapse I m fine mom the rescue team s eyes tear up after hearing the words of the laborer trapped in the tunnel)

या व्हिडीओमध्ये एक कामगार आपल्या आईला सांगतोय की, मी ठीक आहे, काळजी करू नको. त्याचे हे शब्द ऐकल्यानंतर बचाव कार्य करणाऱ्या टीमचे डोळे पाणावले.

- Advertisement -

THDC ने सोमवारी रात्री बडकोट पोळगाव टेल येथून उर्वरित 483 मीटर भागात सूक्ष्म बोगद्याच्या कामाला सुरुवात केली. हा बोगदा चार मीटर व्यासाचा बांधला जात आहे. काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत 6.4 मीटर खोदकाम करण्यात आले. यासोबतच शॉट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. बॅलेस्टिकचे काम ठप्प झाले आहे. बॅलेस्टिक मशीनच्या वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे.

12 नोव्हेंबरपासून मजूर अडकलेत

ब्रह्मखल-यमुनोत्री महामार्गावर निर्माणाधीन 4.5 किमी लांबीच्या सिल्क्यरा बोगद्याचा काही भाग 12 नोव्हेंबर रोजी खचला होता. चारधाम प्रकल्पांतर्गत हा बोगदा ब्रह्मखल आणि यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यरा ते दंडलगाव दरम्यान बांधला जात आहे. 12 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजता हा अपघात झाला. बोगद्याच्या प्रवेश बिंदूपासून 200 मीटरच्या आत 60 मीटरपर्यंत माती खचली. 41 मजूर आत अडकले.

- Advertisement -

16 नोव्हेंबर रोजी बचाव कार्यादरम्यान, बोगद्यातून आणखी दगड पडले आणि त्यामुळे ढिगारा एकूण 70 मीटरपर्यंत पसरला. बोगद्यात अडकलेले कामगार बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील आहेत.

कशी आहे आतील परिस्थिती ?

बोगद्यातील कामगार आणि लोकांची स्थिती जाणून घेण्यासाठी पाईपद्वारे बोगद्यात कॅमेरा पाठवण्यात आला आहे. यामध्ये बोगद्याच्या आतील परिस्थिती टिपण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांनी वॉकी टॉकीजच्या माध्यमातून कामगारांशी संवाद साधला. बोगद्याच्या आतून समोर आलेल्या फुटेजमध्ये त्यांना 09 दिवस बोगद्यात कसे राहावे लागले हे दिसून येते.

बोगद्यातून कामगारांना वाचवण्यात सहभागी असलेले कर्नल दीपक पाटील म्हणाले की, आम्ही बोगद्यात अडकलेल्या लोकांना अन्न, मोबाईल फोन आणि चार्जर पाठवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही आत वायफाय कनेक्शन स्थापित करण्याचा प्रयत्न करू. डीआरडीओचे रोबोटही काम करत आहेत.

बचाव कार्यासाठी नवीन धोरण केले तयार

बचाव कार्यासाठी टीमने नवीन रणनीती बनवली आहे. या अंतर्गत, NHIDCL, ONGC, THDCIL, RVNL, BRO, NDRF, SDRF, PWD आणि ITBP या आठ एजन्सी एकाच वेळी पाच बाजूंनी बोगद्यात खोदकाम करतील.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -