घरदेश-विदेशUttarakhand Tunnel Collapsed : 41 कामगार 8 दिवसांपासून बोगद्यात अडकून, कधी बाहेर...

Uttarakhand Tunnel Collapsed : 41 कामगार 8 दिवसांपासून बोगद्यात अडकून, कधी बाहेर येणार? गडकरी म्हणाले…

Subscribe

उत्तरकाशी : दिवाळीच्या दिवशी उत्तरकाशीतील निर्माणाधीन बोगद्यात झालेल्या दुर्घटनेत अडकलेल्या 41 कामगारांची अद्याप सुटका झालेली नाही. बचावकार्याचा आज आठवा दिवस असून, आता अडकलेल्या कामगारांचा संयम सुटत चालला आहे. अशातच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासह उत्तरकाशीतील घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कामगारांना सुखरूप बाहेर काढणे आमचे प्राधान्य असल्याचे त्यांची वक्तव्य केले आहे. (Uttarakhand Tunnel Collapsed 41 workers stuck in the tunnel for 8 days when will they come out Nitin Gadkari)

नितीन गडकरी आणि पुष्कर सिंह धामी आज सिल्क्यरा येथे पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि बोगद्यात सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत मुख्य सचिव एस.एस.संधूही उपस्थित होते. यानंतर नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री धामी यांनी येथे उपस्थित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर नितीन गडकरी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

- Advertisement -

हेही वाचा – सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली असे केले का? कपिल देव प्रकरणावरून संजय राऊतांचे शरसंधान

नितीन गडकरी म्हणाले की, गेल्या 7-8 दिवसांपासून आम्ही पीडितांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. त्यांना लवकरात लवकर बाहेर काढणे ही उत्तराखंड सरकार आणि भारत सरकारची प्राथमिकता आहे. येथे कार्यरत असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत तासभर चर्चा केली आहे. याशिवाय कामगारांना बाहेर काढण्यासाठी आम्ही सध्या सहा पर्यायांवर काम करत आहोत. भारत सरकारच्या विविध एजन्सी येथे कार्यरत आहेत. पीएमओकडूनही विशेष लक्ष दिले जात आहे. बोगदा तज्ज्ञ आणि बीआरओ अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले आहे.

- Advertisement -

पीडितांना अन्नधान्य पुरवणे ही प्राथमिकता

अडकलेल्या कामगारांना ऑक्सिजन, वीज, अन्न, पाणी आणि औषधे सातत्याने पुरवली जात आहेत. आत्तापर्यंत ज्या पाईपद्वारे अन्न पुरवठा केला जात आहे, त्याशिवाय मोठ्या व्यासाचा पर्यायी पाईप देखील बसविण्यात आला आहे, जेणेकरून त्यांना चपाती, भाजीपाला आणि तांदूळ देखील उपलब्ध करून देता येईल.

हेही वाचा – …तर भारताचे दोन तुकडे झाले असते; डॉ. आंबेडकरांचा उल्लेख करताना वडेट्टीवार असं का म्हणाले?

बोगद्याच्या माथ्यापासून ‘व्हर्टिकल ड्रिलिंग’ सुरू करण्याची तयारी

बोगद्याच्या माथ्यापासून ‘व्हर्टिकल ड्रिलिंग’ सुरू करण्याची तयारी सुरू असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. ते म्हणाले की, कामगारांना लवकर बाहेर काढण्यासाठी शक्य ती सर्व पद्धत अवलंबली जात आहे. केंद्राकडून उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये 2.75 लाख कोटी रुपये खर्चून बोगदे बांधले जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -