घरदेश-विदेशबद्रीनाथ महामार्गावरील बांधकामाधीन पुलाचा काही भाग कोसळला, अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती

बद्रीनाथ महामार्गावरील बांधकामाधीन पुलाचा काही भाग कोसळला, अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती

Subscribe

उत्तराखंडमधील बद्रीनाथ महामार्गावरील नारकोटाजवळीव बांधकामाधीन पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत ढिगाऱ्याखाली 9 जण दबल्याची माहिती समोर आली होती, आता त्यापैकी सहा जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर अद्यापही ढिगाऱ्याखाली 3 – 4 लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आपत्ती, पोलीस आणि प्रशासनाचे बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरु केले आहे. हा पूल सर्व हवामान प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत आहे. आरसीसी कंपनीकडून त्याची निर्मिती केली जातेय, आजही सुमारे 10 लोक पुलाच्या बांधकामात गुंतले होते. मात्र अचानक पुलाचा काही भाग कोसळला.

दरम्यान ढिगाऱ्याखालून काढलेल्या 6 जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आहे. मात्र या घटनेत अर्धा डझनहून अधिक मजूर जखमी झाल्याची माहिती उत्तराखंडचे एसडीआरएफ यांनी दिली आहे.

- Advertisement -

दुर्घटनेचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, या घटनेनंतर एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये पुलाच्या बांधकामात गुंतलेला एक मजूर रडताना दिसत आहे. मोबाईल फोनवर कोणाशी तरी बोलत असताना तो रडत आहे. यादरम्यान, कोणीतरी त्याला विचारले की, तुमच्यापैकी कोणाला दुखापत झाली आहे का, तर तो जोरजोरात रडू लागतो.

- Advertisement -

8 जुलै रोजी देखील झाला भीषण अपघात

8 जुलै रोजी उत्तराखंडमधील रामनगरमध्ये एक कार नदीत पडली, ज्यामध्ये 10 लोक वाहून गेले. पोलीस आणि एसडीआरएफने बचावकार्यानंतर 9 जणांचे मृतदेह बाहेर काढले. त्याचवेळी एक मुलगी आणि एका महिलेचा जीव वाचला.
रामनगर-कोटद्वार रस्त्याच्या दरम्यान असलेल्या कॉर्बेट नॅशनल पार्कच्या ढेला झोनमध्ये हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये राहणारे 11 लोक अर्टिगा कारमधून उत्तराखंडच्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी गेले होते.


शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता द्या, केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -