घरदेश-विदेशUttarkashi Tunnel: उत्तरकाशी बोगद्यात अडकले 40 मजूर; ड्रिलिंग अयशस्वी, 'या' तीन पर्यायांचा...

Uttarkashi Tunnel: उत्तरकाशी बोगद्यात अडकले 40 मजूर; ड्रिलिंग अयशस्वी, ‘या’ तीन पर्यायांचा वापर

Subscribe

गेल्या सात दिवसांपासून त्यांच्या बचावाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र सर्व प्रयत्न करूनही यश मिळत नाही. अशा परिस्थितीत विज्ञान आणि देव या दोघांचाही आधार घेतला जात आहे. क्रेनच्या साहाय्याने पुजाऱ्याने बोगद्याच्या तोंडावर झेंडा लावून नारळ फोडला.

उत्तरकाशी: उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिल्कयारा बोगदा 7 दिवसांपूर्वी कोसळला होता. यामध्ये 7 राज्यांतील 41 मजूर अडकले आहेत. गेल्या सात दिवसांपासून त्यांच्या बचावाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र सर्व प्रयत्न करूनही यश मिळत नाही. अशा परिस्थितीत विज्ञान आणि देव या दोघांचाही आधार घेतला जात आहे. क्रेनच्या साहाय्याने पुजाऱ्याने बोगद्याच्या तोंडावर झेंडा लावून नारळ फोडला. (Uttarakhand Uttarkashi Tunnel 40 laborers trapped in Uttarkashi tunnel Drilling fails use of these three options)

बचावाच्या 7 व्या दिवशी, बोगद्याच्या बाहेर मंदिराची स्थापना केली जात आहे तर दुसऱ्या बाजूने यंत्र आत नेले जात आहेत. तसंच, पूजापाठही केले जात आहेत. खरे तर या अपघातानंतर बोगदा कोसळण्यामागे स्थानिक देवता बाबा बौखनाग यांचा रोष असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. बाबा बोखनाग यांच्या रागामुळे बोगदा फुटल्याचे गावकऱ्यांनी सांगितले कारण बांधकामासाठी त्यांचे मंदिर पाडण्यात आले होते.

- Advertisement -

चारधाम ऑल वेदर रोड प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले. यामध्ये एक बोगदा करण्यात आला होता, ज्याचा काही भाग कोसळला होता. बांधकाम कंपनीने मंदिर पाडल्यानंतर काही दिवसांनी बोगदा कोसळून 41 कामगार अडकले.

अमेरिकन ऑगर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड

बचाव कार्यात वापरल्या जाणाऱ्या अमेरिकन ऑगर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे शुक्रवारी काही काळ बचावकार्यही थांबवण्यात आले. मशीन पुढे जाण्यास सक्षम नसल्याचे सांगण्यात आले. मशीनचे बेअरिंग खराब होत आहे. अशा स्थितीत आता प्लॅटफॉर्मवर नांगर बसवून मशीन लावण्यात येत आहे. शुक्रवारपर्यंत, मशिनने फक्त 24 मीटरपर्यंत ड्रिल आणि पाईप टाकले.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

आंतरराष्ट्रीय टनेल तज्ज्ञ प्रा. अरनॉल्ड डिक्स यांनी एका खासगी वाहिनीला सांगितले की ते बचावकार्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, जर पुढील काही तासांत बचाव कार्य प्रभावी झाले नाही तर आणखी काही देशांतील एक्सपर्ट मदत करण्यासाठी भारतात येतील. ते म्हणाले की, भारत हा बोगदा बांधण्यात जगातील आघाडीचा देश आहे. आम्ही भारताला सर्व मदत करत आहोत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. 41 जीव धोक्यात आहेत.

बचावासाठी या 3 योजना आखण्यात आल्यात

1. डोंगराच्या माथ्यावरून बोगद्यात 100 फुटांपर्यंत उभ्या ड्रिलिंग केल्या जाणार आहेत. मात्र त्या ठिकाणच्या परिस्थितीमुळे कारवाई पूर्ण होण्यास आठवडा लागू शकतो.

2. याशिवाय पारंपारिक पद्धतीने हाताने खोदून बोगदा तयार केला जाऊ शकतो. ज्याचा वापर मुख्यतः जलविद्युत प्रकल्प आणि बोगद्याच्या बांधकामात केला जातो.

3. तुटलेल्या खडकाचे मजबूत खडकात रूपांतर करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान पद्धती वापरण्याचाही विचार केला जात आहे.

(हेही वाचा: त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं; राष्ट्रपतींच्या भेटीनंतर राऊतांनी सुचवला आरक्षणावर पर्याय, म्हणाले… )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -