Uttar Pradesh : बिहारमध्ये विषारी दारुमुळे ६ जणांचा मृत्यू ; ८ अधिकाऱ्यांचे निलंबन

बिहारमध्ये दारुबंदी असूनही दारुमुळे झालेल्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.  बिहारमधील बक्सर आणि उत्तरप्रदेशच्या राय बरेलीमध्ये विषारी दारुमुळे काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बिहारमधील आमसारी गावातील ६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे बिहारमध्ये 'दारुबंदी' फक्त नावापुरतीच आहे हे समोर आलं आहे.

uttarapradesh : 6 people died due to spurious liquor in bihar
Uttar Pradesh : बिहारमध्ये विषारी दारुमुळे ६ जणांचा मृत्यू ; ८ अधिकाऱ्यांचे निलंबन

बिहारमध्ये दारुबंदी असूनही दारुमुळे झालेल्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.  बिहारमधील बक्सर आणि उत्तरप्रदेशच्या राय बरेलीमध्ये विषारी दारुमुळे काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बिहारमधील आमसारी गावातील ६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे बिहारमध्ये ‘दारुबंदी’ फक्त नावापुरतीच आहे हे समोर आलं आहे. एका मृताच्या नातेवाईकाच्या माहितीनुसार, ‘हा प्रकार विषारी दारुमुळे घडला आहे. त्यामुळे प्रशासन काय करत आहे? जर संपूर्ण राज्यात दारुबंदी असेल, तर इथे दारु कशी मिळतं आहे ?, असा सवाल संतप्त नागरिकांकडून केला जात आहे.

याशिवाय पोलिसांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशच्या रायबरेली जिल्ह्यामधील पहाडंपुर गावात एका अधिकृत दारुच्या दुकानातून या दारुची खरेदी करण्यात आली होती. त्या दुकानातील विषारी दारु पिऊनच सहा जणांवर मृत्यू ओढावला आहे. याशिवाय काहीजण आजारी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिस अधिकाऱ्याने जिल्ह्याच्या पाच पोलिस कर्मचाऱ्यांना आणि उत्पादन शुल्क विभागाच्या तीन अधिकाऱ्यांना म्हणजेच एकूण आठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी श्रीवास्तव यांनी सांगितल्यानुसार, मंगळवारी रात्री गावातील एका कार्यक्रमानंतर लोकांनी दारु घेतली होती. त्यानंतर त्या सर्वांची तब्ब्येत बिघडली. बुधवारी गावात पोहोचलेले लखनऊचे आयुक्त रंजन कुमार यांनी या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, दारु ही अधिकृत दुकानातून खरेदी करण्यात आली होती. आयुक्तांनी सांगितले की, दारु सेवन केल्यामुळे हे लोक आजारी पडले आणि त्यामुळे त्यांना सतत उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर त्यांना जवळच्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. दारुचे नमुने एकत्र करुन ते तपासणासाठी पाठवण्यात गेले.

 


हे ही वाचा – Shattila Ekadashi 2022 : सुख – समृद्धीसाठी उद्याचा दिवस महत्वाचा, फक्त तिळाचा करा असा उपयोग