घरदेश-विदेशउत्तरकाशी: बोगद्यात 9 दिवसांपासून 41 मजूर कसे राहात आहेत? सीसीटीव्ही फुटेज प्रथमच...

उत्तरकाशी: बोगद्यात 9 दिवसांपासून 41 मजूर कसे राहात आहेत? सीसीटीव्ही फुटेज प्रथमच समोर

Subscribe

बचाव पथकाने पाईपद्वारे या कामगारांना बाटल्यांमध्ये गरम खिचडी पाठवली. इतके दिवस योग्य आहार न मिळाल्याने ते अशक्त झाले आहेत. तसंच, हे मजूर बोगद्यात कसे राहत आहेत, त्याचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे.

उत्तरकाशी: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये बोगदा कोसळल्यानंतर 41 मजूर मागच्या 09 दिवसांपासून अडकून पडले आहेत. रेस्क्यू टीम त्यांना अद्याप सुरक्षित बाहेर काढू शकलेली नाही. ढिगारा आणि वरून माती साचल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, सोमवारी (20 नोव्हेंबर) नवीन 6 इंची पाईपलाईनने या मजुरांना प्रथमच खिचडी पोहोचवण्यात यश आले आहे. बचाव पथकाने पाईपद्वारे या कामगारांना बाटल्यांमध्ये गरम खिचडी पाठवली. इतके दिवस योग्य आहार न मिळाल्याने ते अशक्त झाले आहेत. तसंच, हे मजूर बोगद्यात कसे राहत आहेत, त्याचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. (Uttarkashi How are 41 laborers staying in the tunnel for 9 days CCTV footage exposed for the first time)

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, हेमंत नावाच्या स्वयंपाक्याने बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांसाठी खिचडी तयार केली. त्यांनी सांगितले की, कामगारांना गरम अन्न पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

- Advertisement -

12 नोव्हेंबरपासून मजूर अडकलेत

ब्रह्मखल-यमुनोत्री महामार्गावर निर्माणाधीन 4.5 किमी लांबीच्या सिल्क्यरा बोगद्याचा काही भाग 12 नोव्हेंबर रोजी खचला होता. चारधाम प्रकल्पांतर्गत हा बोगदा ब्रह्मखल आणि यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यरा ते दंडलगाव दरम्यान बांधला जात आहे. 12 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजता हा अपघात झाला. बोगद्याच्या प्रवेश बिंदूपासून 200 मीटरच्या आत 60 मीटरपर्यंत माती खचली. 41 मजूर आत अडकले.

16 नोव्हेंबर रोजी बचाव कार्यादरम्यान, बोगद्यातून आणखी दगड पडले आणि त्यामुळे ढिगारा एकूण 70 मीटरपर्यंत पसरला. बोगद्यात अडकलेले कामगार बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील आहेत.

- Advertisement -

बचाव कार्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीचे म्हणणे काय?

बोगद्यात अडकलेल्या कामगारांना खायला काय पाठवले जात आहे? त्याला उत्तर देताना ते म्हणाले की, कामगारांची स्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांच्या मदतीने एक तक्ता तयार केला आहे. आम्ही केळी, सफरचंद, खिचडी आणि लापशी रुंद तोंडाच्या प्लास्टिकच्या दंडगोलाकार बाटल्यांमध्ये पाठवत आहोत.

आदल्या दिवशी, नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​संचालक अंशू मनीष खालको म्हणाले की, 6 इंची पाईप यशस्वीरित्या टाकण्यात आल्याचे कळल्यानंतर अडकलेल्या मजुरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या खाण्यापिण्याची समस्या संपली. आता बचाव पथक कामगारांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे.

बोगद्यात अडकलेले कामगार बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील आहेत. यातील एका मजुराला दमा तर दुसऱ्या मजुराला मधुमेह आहे. त्यांच्यापर्यंत पाईपद्वारे औषधेही दररोज पाठवली जात आहेत.

कशी आहे आतील परिस्थिती ?

बोगद्यातील कामगार आणि लोकांची स्थिती जाणून घेण्यासाठी पाईपद्वारे बोगद्यात कॅमेरा पाठवण्यात आला आहे. यामध्ये बोगद्याच्या आतील परिस्थिती टिपण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांनी वॉकी टॉकीजच्या माध्यमातून कामगारांशी संवाद साधला. बोगद्याच्या आतून समोर आलेल्या फुटेजमध्ये त्यांना 09 दिवस बोगद्यात कसे राहावे लागले हे दिसून येते.

बोगद्यातून कामगारांना वाचवण्यात सहभागी असलेले कर्नल दीपक पाटील म्हणाले की, आम्ही बोगद्यात अडकलेल्या लोकांना अन्न, मोबाईल फोन आणि चार्जर पाठवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही आत वायफाय कनेक्शन स्थापित करण्याचा प्रयत्न करू. डीआरडीओचे रोबोटही काम करत आहेत.

बचाव कार्यासाठी नवीन धोरण केले तयार

बचाव कार्यासाठी टीमने नवीन रणनीती बनवली आहे. या अंतर्गत, NHIDCL, ONGC, THDCIL, RVNL, BRO, NDRF, SDRF, PWD आणि ITBP या आठ एजन्सी एकाच वेळी पाच बाजूंनी बोगद्यात खोदकाम करतील.

(हेही वाचा: राहुल गांधी यांच्या नागरिकतेवरून सुब्रमण्यम स्वामी यांचे अमित शहांना पत्र, काय आहे प्रकरण?)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -