घरताज्या घडामोडीUP Election : निवडणुकांमध्ये मोदी-योगींच्या २ लाख प्रिंटेट साड्यांचे वाटप ; प्रचारासाठी...

UP Election : निवडणुकांमध्ये मोदी-योगींच्या २ लाख प्रिंटेट साड्यांचे वाटप ; प्रचारासाठी भाजपची अनोखी रणनीती

Subscribe

देशातील 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. अजूनही जाहीर प्रचार करण्यासाठी बंदी असल्यामुळे डिजीटल माध्यमातून प्रचार करण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुका म्हटलं की जनतेचं मत हे आलंच त्यामुळे जनतेला खूश करण्यासाठी अनेक राजकीय पक्ष वेगवगळ्या रणनीती आखत असतात. दरम्यान,उत्तरप्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने महिलांचे मन जिंकण्यासाठी एक अनोखी रणनीती आखली आहे.

देशातील 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. अजूनही जाहीर प्रचार करण्यासाठी बंदी असल्यामुळे डिजीटल माध्यमातून प्रचार करण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुका म्हटलं की जनतेचं मत हे आलंच त्यामुळे जनतेला खूश करण्यासाठी अनेक राजकीय पक्ष वेगवगळ्या रणनीती आखत असतात. दरम्यान,उत्तरप्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने महिलांचे मन जिंकण्यासाठी एक अनोखी रणनीती आखली आहे. भाजप साड्यांचे वाटप करुन या माध्यामातून लोकांच्या मनात उतरण्याचा प्रयत्न करत आहे. बहुमताने निवडून येण्यासाठी महिलांना साड्यांचे वाटप केले जात आहे. या साड्या साध्या नसून, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फोटोंची प्रिंट या सांड्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोंशिवाय साड्यांवर भाजपच्या घोषणासुद्धा छापल्या आहेत. मागील कोणत्याही निवडणुकांमध्ये असा कोणताही प्रकार पाहायला मिळाला नाही. दरम्यान, या निवडणुकांध्ये दोन लाख साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

- Advertisement -

या फोटो प्रिंटच्या जवळपास 50 हजार साड्यांसाठी उत्तरप्रदेशातील लखनऊ,कानपुर,गोरखपुर आणि वाराणसी या चार शहरातून या साड्या बुक करण्यात आल्या आहेत. सुरतमध्ये कामकाज करणाऱ्या गोरखपूर आणि कानपूरच्या दोन व्यापाऱ्यांनी यूपीच्या 40 जिल्ह्यांमध्ये आपल्या व्यापाऱ्यांमार्फत एक लाख साड्यांची विक्री केली आहे. या सर्व प्रिंटेड साड्या सुरतमध्ये तयार केल्या जात आहेत. कारण संपूर्ण देशातील सर्वांत स्वस्त साडी ही सुरतमध्येच तयार होते. मिळालेल्या माहितीनुसार, दोन लाख साड्यांची ऑर्डर ही एक दोन दिवसांतच मिळाली आहे. साड्यांवरती राम मंदिराचे छायाचित्र असून, यूपी विधानसभा निवडणुकीत राम मंदिर उभारण्याचे श्रेय भाजप घेत असून, हा प्रचाराचा मुद्दा बनविण्यात येत असल्याचं दिसून येत आहे.

साड्यांवर ‘या’ गोष्टींचेही आहे प्रिंट..

सांड्यावर काशी विश्वनाथ कॉरिडोर आणि अयोध्या राम मंदिर,योगी-मोदींचा सोबत असलेला फोटो याशिवाय कमळाच्या प्रिंटसोबत भाजप सरकार आणि हिंदुत्वाच्या घोषणासुद्धा लिहिण्यात आल्या आहेत. या सर्व साड्यांना उत्तरप्रदेशमध्ये वाटण्याची योजना आखण्यात आली आहे. साड्यांची जास्त प्रमाणातील डिझाइन ही 3डी प्रिंट आहे. ‘जो राम को लाए हैं, उनको हम लेकर आएंगे…’ यासारखे घोषणा प्रिंट करण्यात आल्या आहेत. मेरठ, लखनऊ, कानपुर आणि गोरखपुरच्या साड्यांच्या शोरुममध्ये या साड्या उपलब्ध आहेत. या साड्यांसाडी भाजप समर्थकांकडून अनेक ऑर्डर येत आहेत. कोरोनाकाळात अनेक गोष्टी ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे त्याचा कापड उद्योगांवरही परिणाम झाला होता. मात्र भाजपच्या अनोख्या रणनीतीमुळे कापडउद्योगांना सुगीचे दिवस आले असून, व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनी गुप्तचर यंत्रणेचा अलर्ट! देशात कारस्थानाचा देशद्रोहींचा कट; CAA-NRC मधील लोकांवर करडी नजर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -