घरदेश-विदेशयोगी आदित्यनाथ देशद्रोही; माजी लष्कर प्रमुखांची योगींवर टीका

योगी आदित्यनाथ देशद्रोही; माजी लष्कर प्रमुखांची योगींवर टीका

Subscribe

'भारतीय लष्कर कोणत्याही पक्षाचं नाही, जे लोक असा दावा करतील ते देशद्रोही आहेत', अशी टीका व्ही. कें सिंह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतीय लष्कराला मोदींची सेना असे म्हटले होते. गाझियाबादला १ एप्रिल रोजी प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचारसभेत लोकांना संबोधित करताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. योगींच्या याच वक्तव्यावरुन केंद्रिय परराष्ट्र राज्यमंत्री आणि माजी लष्करप्रमुख व्ही. के सिंह यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ‘भारतीय लष्कर कोणत्याही पक्षाचं नाही, जे लोक असा दावा करतील ते देशद्रोही आहेत’, अशी टीका व्ही. कें सिंह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली आहे.

नेमकं काय म्हणाले व्ही. के. सिंह?

व्ही. के. सिंह म्हणाले की, ‘यासंदर्भात मला काहीही माहिती नाही. परंतु भारताचं लष्कर हे देशाचं आहे. भारतीय लष्कर कोणत्याही राजकीय पक्षाचं नाही. जर कोणी असं म्हणत असेल की भारताची सेना ही मोदींची सेना आहे, तर तो चुकीचं म्हणत आहे. खरंतर तसं बोलणारी ती व्यक्तीच देशद्रोही आहे.’

- Advertisement -

माजी नौदल प्रमुखांचे निवडणूक आयोगाला पत्र

सोमवारी प्रचारसभेत योगी आदित्यनाथ यांनी भारतीय लष्कराचा उल्लेख मोदी की सेना असा केला होता. त्यामुळे सुरक्षा दलाचे काही अधिकारी नाराज झाले होते. दरम्यान, माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -