घरCORONA UPDATEVaccination at home: सोमवारपासून बिकानेरमध्ये घरोघरी जाऊन लसीकरण

Vaccination at home: सोमवारपासून बिकानेरमध्ये घरोघरी जाऊन लसीकरण

Subscribe

लसीकरण मोहीमेसाठी जिल्हा प्रशासनाने एक हेल्पलाईन क्रमांक जारी

देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बऱ्याचदा ४५ वर्षांवरील अनेक नागरिकांना लस घेण्यासाठी घराबाहेर पडणे शक्य होत नाही किंवा त्यांना कोरोना प्रादुर्भाव होण्याची भिती असू शकते. त्याचप्रमाणे अनेक अंपग व्यक्तींनाही लसीकरण केंद्रापर्यंत आणण्यासाठी अनेक अडचणी येऊ शकतात. त्यासाठी घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची योजना राबवण्यात येत आहे. त्यासाठी राजस्थान सरकारने पुढाकार घेतला आहे. येत्या सोमवारपासून राजस्थान बिकानेरमध्ये घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम सुरु होणार आहे. बिकानेरमधील ४५ वर्षांवरील नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लस देण्यात येणार आहे. (Vaccination at home: door to door vaccination in Bikaner from Monday) त्यामुळे राजस्थान बिकानेर हे पहिले राज्य ठरले आहे जिथे घरोघरी जाऊन लसीकरण केले जाणार आहे.

या लसीकरण मोहीमेसाठी जिल्हा प्रशासनाने एक हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. या हेल्पलाईनच्या मदतीने नागरिकांना लसीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे. जिल्ह्यात कमीत कमी दहा लोकांनी लसीसाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर मोबाईल टिम आपली व्हॅन घेऊन लोकांच्या घरी जाऊन त्यांना लस देणार आहे. या टिमसोबत मेडिकल स्टाफचीही नियुक्ती करण्यात आली असून ती व्यक्ती लस दिल्यानंतर लस घेतलेल्या व्यक्तीने निरिक्षण करणार आहे.

- Advertisement -

बिकानेरमधील १६ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवकांना घरोघरी जाऊन लसीकरण करणाच्या मोहिमेसाठी काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बिकानेरमध्ये ज्या लोकांना लस देण्यात आली आहे त्यांच्या आरोग्याकडे आरोग्य केंद्रातील व्यक्तींना काही दिवस लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. बिकानेरमध्ये आतापर्यंत ६५ टक्के लोकांचे लसीकरण करुन पूर्ण झाले आहे. लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी राजस्थान सरकारने राबवलेल्या या उपाययोजनांमुळे नागरिकांना नक्कीच फायदा होणार आहे.


हेही वाचा – India Corona Update: देशाच्या रुग्णसंख्येत घट, १ लाखांहून अधिक कोरोनामुक्त

- Advertisement -

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -