घरCORONA UPDATEVaccination: २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीची चाचणी १० ते १२...

Vaccination: २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीची चाचणी १० ते १२ दिवसात होणार सुरु- NITI आयोग

Subscribe

कोव्हॅक्सिन लसीला DCGI कडून क्लिनिकल ट्रायलला  मंजूरी दिली

देशात लसींचा साठा उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. देशात लसीकरणाचा (Corona Vaccination) तिसरा टप्पा सुरु आहे. १ मे पासून देशात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली आहे. आता केवळ २ ते १८ वयोगटातील लहान मुलांना कोरोना लस कधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी चिंताजनक ठरु शकते. त्यामुळे २ ते १८ वयोगटातील मुलांची कोव्हक्सिन लसीची क्लिनिकल चाचणी येत्या १० ते १२ दिवसात सुरु करण्यात येईल असे निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के .पॉल यांनी सांगितले आहे. (clinical Testing of covaxin vaccine for children between ages of 2 to 18 will start in 10 to 12 days) कोव्हॅक्सिन लसीला DCGI (Drugs Controller General of India ) कडून २ ते १८ वयोगटातील मुलांच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलला  मंजूरी दिली आहे, असे डॉ. व्ही,के.पॉल यांनी सांगितले.


पुढील काही महिन्यात देशात कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. या लाटेत देशातील तरुणमंडळीं, लहान मुलांना सर्वांत मोठा धोका निर्माण होऊ शकतो असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर DCGI ने लहान मुलांच्या लसीकरणासाठी क्लिनिकल चाचणी करण्यासाठी परवानगी दिली आहे. केंद्राच्या अधिकृत प्रेसनोटमध्ये असे म्हटले आहे की, ५२५ निरोगी स्वयंसेवकांसमवेत ही चाचणी केली जाणार आहे. २८ दिवसांच्या फरकांनी दोन डोस देण्यात येतील.

- Advertisement -

भारताने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेआधी योग्य उपाययोजना केल्या तर तिसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरणार नाही. योग्य वेळी आवश्यक पावले उचलल्यास भारत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सापडणार नाही,असे सरकारी सर्वौच्च वैज्ञानिक सल्लागार डॉ. के विजय राघवन यांनी सांगितले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कोरोनाचा विषाणू कोणत्या उच्चतम पातळीवर असेल हे सांगता येत नाही. मात्र तिसऱ्या लाटेसाठी सर्वानी तयार राहिले पाहिजे,असेही ते म्हणाले.


हेही वाचा – corona vaccination: कोरोनामुक्त झालेल्या नागरिक ९ महिन्यानंतर घेऊ शकतात लस, NTAGI चा सल्ला

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -