घरCORONA UPDATEकोरोनावरील लस तयार करायला एक वर्ष लागेल - युरोपियन औषध एजन्सी

कोरोनावरील लस तयार करायला एक वर्ष लागेल – युरोपियन औषध एजन्सी

Subscribe

युरोपियन मेडिसीन एजन्सीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणू वरील लस मंजुरीसाठी तयार होईल आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल. मात्र, त्याला किमान एक वर्ष लागेल.

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनावर अद्याप कोणतीच लस तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आलेले नाही. आता पर्यंत कोणतेच औषध कोरोनावर यशस्वी होऊ शकले नाही. दरम्यान, युरोपियन औषध एजन्सी असो म्हटले आहे की, कोरोनावरील लस तयार करायला एक वर्ष लागेल. एक वर्षाने कोरोना विषाणू वरील लस मंजुरीसाठी तयार होईल आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल, अशी माहिती युरोपियन औषध एजन्सीने मंगळवारी दिली. कोरोनाबाधितांचा आकडा ८ लाख ५८ हजार ६६९ वर पोहोचला आहे. चीनमधून उद्भवलेल्या कोविड -१९ विरूद्ध लस तयार करण्याची शर्यत सुरू आहे. आतापर्यंत कोणतेही औषध कोरोना व्हायरसवर उपचार असल्याचे दिसून आले नाही. आतापर्यंत जवळजवळ ४२ हजार १५१ लोकांचा बळी गेला आहे.


हेही वाचा – Coronavirus: कोरोनाव्हायरस विरुद्धच्या लढ्यात व्हेंटिलेटर का आवश्यक आहेत?

- Advertisement -

युरोपियन मेडिसीन एजन्सीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणू वरील लस मंजुरीसाठी तयार होईल आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल. मात्र, त्याला किमान एक वर्ष लागेल. हे सध्या कोरोनावरील उपलब्ध माहिती आणि लस विकास कालावधीच्या मागील अनुभवावर आधारित असल्याचे अ‍ॅमस्टरडॅम-आधारित एजन्सीने सांगितले. त्यात असेही म्हटले आहे की निरोगी स्वयंसेवकांवर केलेल्या दोन क्लिनिकल चाचण्यांच्या पहिल्या टप्प्यात प्रवेश केला आहे. परंतु सर्वसाधारणपणे औषधी उत्पादनांच्या विकासाच्या टाइमलाइनचा अंदाज बांधणे कठीण आहे, असे ईएमएने म्हटले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -