घरCORONA UPDATEBooster Dose : ...तर 9 महिन्यांत बूस्टर डोस घेण्याचा काहीच फायदा नाही;...

Booster Dose : …तर 9 महिन्यांत बूस्टर डोस घेण्याचा काहीच फायदा नाही; तज्ज्ञांनी सांगितले कारण

Subscribe

भारतात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितही कोरोनाविरोधी दोन लसींच्या डोसनंतर बूस्टर किंवा प्रिस्क्रिप्शन डोस घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, सरकारने दोन डोसनंतर प्रिस्क्रिप्शन डोसमध्ये 9 महिन्यांचे अंतर असणे अनिवार्य केले असून ते अवैज्ञानिक आहे. यावर फोर्टिस सी-डॉकचे अध्यक्ष डॉ अनूप मिश्रा म्हणाले की, “बहुतेक अभ्यासातून असे दिसून आले की, लसीच्या दोन डोसद्वारे तयार होणारे न्यूट्रलाइजिंग अँटीबॉडी 4 ते 6 महिन्यांनंतर कमी होऊ लागतात. त्यामुळे दोन डोसमधील अंतर सहा महिन्यांपेक्षा जास्त नसावे. असे तज्ज्ञांचे मत आहे. परंतु बुस्टर डोसमध्ये नेमके किती दिवसांचे अंतर असावे यावर तज्ज्ञांचे काय मत आहे? आणि इतर देशांमध्ये बूस्टर डोससाठी किती अंतर आहे? जाणून घेऊ.

इतर देशांचे उदाहरण द्याचे झाल्या, अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) ने दोन डोसमध्ये पाच महिन्यांचे अंतर ठेवण्याची शिफारस केली आहे. तर यूकेमध्ये16 वर्षांपेक्षा जास्त वयावरील प्रत्येकासाठी बूस्टर डोस दुसऱ्या डोसच्या तीन महिन्यांनंतर उपलब्ध आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेले लोक जसे की ब्लड कॅन्सर पीडित लोकांना दुसऱ्या डोसच्या आठ आठवड्यांनंतर कधीही तिसरा डोस घेऊ शकतात. नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) नुसार, , ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे त्यांना बूस्टर डोसनंतर तीन महिन्यांनी चौथा डोस घेता येतो.

- Advertisement -

एम्सचे माजी डीन डॉ एन के मेहरा यांनी स्पष्ट केले, ‘कोविड विरूद्ध प्रतिकारशक्ती दोन प्रकारे येते. पहिली ह्युमरल इम्युनिटी आहे, जी अँटीबॉडीजच्या निर्मितीमध्ये आढळते आणि दुसरी सेल-मध्यस्थ प्रतिकारशक्ती आहे. कोरोनासारख्या विषाणूजन्य संसर्गामध्ये गंभीर आजार रोखण्यात या दोन्हींचा महत्त्वाचा वाटा आहे. दरम्यान सहा-आठ महिन्यांत अँटीबॉडीज कमी होऊ लागतात हे अनेक अभ्यासांमध्ये सिद्ध झाले आहे. कारण अँटीबॉडीज बनवणाऱ्या प्लाझ्मा पेशींचे आयुष्य कमी असते.

ते म्हणाले, ‘सेल मेडिएटेड इम्युनिटी एक्टिव्ह राहते पण चांगल्या सुरक्षेसाठी ह्यूमरल रोग प्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच बूस्टर डोस आवश्यक आहे. कर्करोगाचे रुग्ण, मधुमेही रुग्ण किंवा वृद्ध व्यक्तींसारख्या ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे, त्यांना प्राथमिक लसीकरणानंतर सहा महिन्यांनी बूस्टर डोस देण्याची परवानगी दिली पाहिजे.

- Advertisement -

कोविडच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना, प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की त्यांनी दिलेला लसीचा डोस (कोव्हॅक्सिन किंवा कोविशील्ड) अजूनही संरक्षण देत आहे का? याबाबत अभ्यास करणाऱ्या ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, ज्या लोकांना कोविडशील्ड लस घेतली आहे आणि त्यांना कधीही कोविड झाला नाही, त्यांना ओमिक्रॉनच्या व्हेरिएंटचा संसर्ग वाढू शकतो. अशा परिस्थितीत त्यांना नक्कीच बूस्टर मिळायला हवा.

त्याच वेळी ज्यांना संसर्ग झाल्यानंतर लसीकरण करण्यात आले होते, त्यांच्यामध्ये ओमिक्रॉन विरूद्ध अँटीबॉडीची पातळी योग्य असल्याचे दिसून आले. यापूर्वीही कोवॅक्सिनबाबत असाच अहवाल समोर आला होता. एकंदरीत, ओमिक्रॉन आणि त्याचे सर्व व्हेरिएंट यापैकी कोणत्याही लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही रुग्णाला खूप आजारी करू शकतात. अशा परिस्थितीत आता बूस्टर डोसचा सल्ला देण्यात आला आहे.

Covishield वरील संशोधनात आणखी काय दिसून आले?

कोविशील्ड लसीवर केलेल्या अभ्यासात असे समोर आले आहे की, या लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही ओमिक्रॉनचा प्रभाव व्यक्तीमध्ये दिसून येतो. एवढेच नाही तर ओमिक्रॉनच्या नवीन सब व्हेरिएंटमुळे शरीरातील अँटीबॉडीजवर परिणाम होत आहे. दुसरीकडे, बूस्टर डोस घेतल्यास मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज या व्हेरिएंट किंवा सब व्हेरिएंटविरूद्ध प्रभावी होऊ शकतात. आयसीएमआरच्या एका शास्त्रज्ञाने म्हटले आहे की, ओमिक्रॉनची स्पाइक डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक शक्तिशाली आहे.

तथापि, ज्या लोकांनी कोव्हिशील्ज (Coveshield) आहे त्यांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कोरोनाविरोधात लढण्यासाठी ही लस घेतलेल्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती मजबूत आहे. परंतु Omicron व्हेरिएंटवविरोधात या प्रतिकारशक्तीचा प्रभाव कमी झाला आहे. संशोधकांना असे आढळून आले की, लसीमध्ये आढळलेल्या अँटीबॉडीनी ओमिक्रॉनच्या सब व्हेरिएंटपेक्षा बीटा आणि डेल्टा व्हेरिएंट अधिक प्रभावीपणे तटस्थ केले. ओमिक्रॉनच्या तुलनेत सीरममध्ये अँटीबॉडी मूल्ये सर्वात कमी 0.11 असल्याचे आढळले, तर इतर प्रकरणांमध्ये सरासरी 11.28 आणि 26.25 होती.


भारतीय रेल्वेला ‘या’ स्थानकाच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -