Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE vaccine: लहान मुलांसाठी Zydus Cadilla ने तयार केली लस, लवकरच वापरात येण्याची...

vaccine: लहान मुलांसाठी Zydus Cadilla ने तयार केली लस, लवकरच वापरात येण्याची शक्यता

देशात सध्या १२ ते १८ वयोगटातील सुमारे १२ ते १४ कोटी लहान मुले आहेत

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतात लवकरच लहान मुलांसाठी कोरोना विरोधी लस येऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, झायडस कॅडिलाने (Zydus Cadilla) लहान मुलांसाठी एक लस तयार केली आहे. ( Vaccine developed by Zydus Cadilla for young children)  ज्या लसीच्या वापरासाठी जून महिन्यात ड्रग कंट्रोलरकडून मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. १२ ते १८ वयोगटातील मुलांवर या लसीची चाचणी करण्यात आली आहे. या लसीला मंजूरी मिळाली असता लहान मुलांसाठी देशात मंजूरी मिळणारी ही पहिली लस ठरु शकते. देशात पालकांसोबतच लहान मुलांनाही लस देणे अत्यंत गरजेचे आहे. देशात सध्या १२ ते १८ वयोगटातील सुमारे १२ ते १४ कोटी लहान मुले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी जवळपास २५ कोटींचा गरज देशाला भासणार आहे.

भारतात कोव्हॅक्सिन लसीच्या देखील लहान मुलांवर चाचण्या करण्यात येत आहेत. तीन टप्प्यात या चाचण्या सुरु आहेत. यात २ ते ५ वर्षे वयोगटातील,५ ते १२ वयोगटातील आणि १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचा समावेश आहे. पुढील दोन ते तीन महिन्यात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी लस तयार होईल. त्याचप्रमाणे पुढील काही दिवसात फायइर आणि मॉडर्ना या लसी देखील भारतात आणल्या जाऊ शकतात.

- Advertisement -

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून मागील दीढ वर्षांत देशभरातील शाळा ओस पडून आहेत. मुलांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरु आहे. मुलांचे लसीकरण केल्याशिवाय शाळा  सुरु करता येणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत लहान मुलांचे लसीकरण लवकरात लवकर कसे करता येईल हा मोठा प्रश्न देशासमोर आहे. फोनच्या स्क्रिनमध्ये अडकलेल्या मुलांना सामान्य जीवन जगण्याची इच्छा आहे. लसीकरण न केल्यामुळे मुलांच्या शाळ सुरु केल्या जात नाहीत. त्यामुळे झायडस कॅडिलाच्या लसीला लहान मुलांसाठी परवानगी दिली तर लहान मुलांच्या लसीकरणाचा प्रश्न लकरच सुटणार आहे.


हेही वाचा – दिलासा! लवकरच देशात स्पाइक प्रोटीनयुक्त असणारी स्वस्त Corona Vaccine मिळणार

- Advertisement -

 

- Advertisement -