घरCORONA UPDATESII : सीरम इन्स्टिट्यूटची संशोधनात मोठी गुंतवणूक, Oxford विद्यापीठाला ६.६ कोटी देणार

SII : सीरम इन्स्टिट्यूटची संशोधनात मोठी गुंतवणूक, Oxford विद्यापीठाला ६.६ कोटी देणार

Subscribe

जगातील सर्वात मोठी कोरोनाविरोधी लस निर्माता कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) संशोधन कॅम्प स्थापन करण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाला ५० कोटी पौंड ( ६.६ कोटी रुपये) देण्याचे आश्वासन दिले आहे.या AstraZeneca वर काम करणाऱ्या संस्थेचा देखील समावेश असेल.

ही गुंतवणूक स्वदेशी कंपनी सीरम लाइफ सायन्सेस युनिटच्या माध्यामातून केली जात आहे. असे ऑक्सफर्ड युनिर्व्हसिटीने बुधवारी सांगितले. या संशोधन कॅम्पला सीरमचे अब्जाधीश मालक, पूनावाला कुटुंबाचे नाव दिले जाईल. यात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, AstraZeneca आणि SII जगातील सर्वात मोठ्या प्रमाणात लस निर्मिती कंपन्या आणि ब्रिटीश लस निर्मिती कंपन्यांमध्ये समन्वय राखण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्यातून कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या गरीब देशांना लसी उत्पादनसाठी सहकार्य केले जाईल.

- Advertisement -

SII ने जेनरच्या R21/Matrix-M मलेरिया लसीचे उत्पादन आणि विकास करणासाठी ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका कोविड-19 लसीच्या मागील जेनर इन्स्टिट्यूटशी देखील सहमती दर्शवली आहे. सधा सर्व लसी लेट-स्टेज ट्रायलमध्ये आहेत.

फोर्ब्सनुसार, SII ची स्थापना १९६६ मध्ये पुण्यातील घोडा ब्रीडर यांचा मुलगा आणि भारतातील पाचव्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती सायरस पूनावाला यांनी केली. २०१९ मध्ये सायरस यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाने मानद पदवी देखील बहाल केली.

- Advertisement -

सध्या त्यांचा मुलगा अदार पूनावाला ही संस्था चालवत आहे, ज्यांची पत्नी नताशा पूनावाला सीरम लाइफ सायन्सेसच्या प्रमुख आहेत. लक्झरी कार आणि रेस हॉर्सेसची आवड असलेली ही जोडी अनेकदा हॉलिवूड आणि बॉलीवूड स्टार्सच्या खांद्याला खांदा लावताना दिसते. पूनावालांनी सप्टेंबरमध्ये ऑक्सफर्ड बायोमेडिकामध्ये ५० दशलक्ष पौंडांची गुंतवणूक केली ज्यामुळे कोरोनाविरोधी लसी बनवणाऱ्या प्लांटच्या विकासासाठी निधी उपलब्ध झाला.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -