घरताज्या घडामोडीकच्चा मालाच्या निर्यातीवरील बंदी उठवा, अदर पूनावालांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना विनंती

कच्चा मालाच्या निर्यातीवरील बंदी उठवा, अदर पूनावालांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना विनंती

Subscribe

कोरोना विषाणूविरोधातील लढाईत आपण खरच एकत्र असू तर..

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी तसेत कोरोनामुळे वाढणारा मृत्यूदर रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहिम सुरु केली आहे. आतापर्यंत ११ करोडपेक्षा अधिक लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. वाढत्या लसींच्या मागणीमुळे देशात कोरोना लसींचा पुरवठा कमी पडत आहे. त्यातच आता अमेरिका-युरोपमधून येणारा कच्चा माल रोखण्यात आला आहे. हा माल रोखला असल्यामुळे लस निर्माण करणे अवघड झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोरोना लसींची निर्मिती करणारे सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अदर पूनावाला यांनी कच्चा मालाच्या निर्यातीवरील बंदी उठवण्यासाठी थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना विनंती केली आहे. अमेरिकेने केलेली कच्चा मालाच्या निर्यातीवरील बंदी उठवा असे ट्विट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना केले आहे.

कोरोना लसीच्या निर्मितीसाठी कच्चा मालाचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. हा कच्चा माल अमेरिका, युरोपमधून मोठ्या प्रमाणात होतो. गेल्या काहिदिवसांपूर्वी अमेरिका आणि युरोपमधील येणाऱ्या कच्चा मालाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. असे अदर पूनावाला यांनी यापूर्वी सांगितले होते. तसेच आता आदर पूनावाला यांनी ट्विट करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांना हात जोडून कच्चा मालावरील निर्यात बंदी उठवण्याची विनंती केली आहे.

- Advertisement -

अदर पूनावाला यांनी म्हटले आहे की, आदरणीय जो बायडेन, कोरोना विषाणूविरोधातील लढाईत आपण खरच एकत्र असू तर अमेरिकेबाहेरील लस उद्योगाच्या वतीने मी आपणांस नम्रपणे विनंती करतो की, अमेरिकेबाहेर होणाऱ्या कच्चा मालावरील निर्यात बंदी उठवा. जेणेकरुन लसीच्या निर्मितीला वेग मिळेल. याबाबत तुमच्या प्रशासनाकडे अधिक सविस्तर माहिती आहे. असे ट्विट सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांनी केले आहे.

 कच्चा मालाचा तुटवडा दूर झाला नाहीतर लस उत्पादन करण्यामध्ये अधिक अडथळा येईल. कोरोना परिस्थिती रोखण्यासाठी आता कोरोना लसींची मोठी गरज आहे. अदर पूनावाला यांनी केलेल्या विनंतीनंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाकडून काय उत्तर येईल का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -