Vaccine: मुंबईला Sputnik V लसीच्या पुरवठ्यासाठी रशियातून तीन निविदा

मुंबई महानगरपालिकेने ११ मे रोजी ही निविदा प्रसिद्ध केली

Three Bids from Russia for supply Sputnik V vaccine to Mumbai
Vaccine: मुंबईला Sputnik V लसीच्या पुरवठ्यासाठी रशियातून तीन निविदा

रशियाने तयार केलेल्या Sputnik V लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. या लसीचे लसीकरणही सुरु करण्यात आले आहे. मुंबईला Sputnik V लसीच्या पुरवठ्यासाठी रशियातून तीन निविदा देण्यात आल्या आहेत. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, मे महिन्याच्या सुरुवातीला BMCने एक कोटी डोसची जागतिक निविदा काढली होती. मुंबई महानगरपालिकेने ११ मे रोजी ही निविदा प्रसिद्ध केली. जेव्हा पंजाब आणि दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार, मुंबईत कोविड लसीच्या पुरवठ्यासाठी नकार दिला तेव्हा RDIFने मुंबई कोरोना लसीच्या पुरवठ्यासाठी बोली लावली. बोली लावण्याची शेवटची तारिख २५ मे होती. आतापर्यंत लावण्यात आलेल्या तीन बोलींमध्ये एक निविदा थेट रशियन गुंतवणूक निधीने दिली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तर बाकी दोन निविदा कंपन्यांच्या स्वतंत्र प्रतिनिधींनी केल्या आहेत. (Three Bids from Russia for supply Sputnik V vaccine to Mumbai)

देशात आता नवीन लसीकरण धोरणाअतर्गंत राज्ये आता लस पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लस उत्पादक कंपन्यांकडून थेट लस खरेदी करण्यासाठी आता राज्यांना मान्यता देण्यात आली आहे. NDTVने दिलेल्या वृत्तानुसर, महाराष्ट्र सरकार उद्या बोली बंद झाल्यानंतर सरकारशी चर्चा करणार आहे. बोलीचे कायदेशीर,तांत्रिक आणि आर्थिक बाबींचा अंतिम मुदतीनंतर पुढील दोन आठवड्यात विचार केला जाईल. RDIF किंवा त्यांचे प्रतिनिधी ६० दिवसात १ कोटी लस BMCकडे हस्तांतरित करण्यासाठी तयार आहेत. Sputnik Vची प्रस्तावित आयात जर झाली तर डॉ. रेड्डी यांच्या नियंत्रणाखाली हैद्राबाद येथे लस तयार करण्यासाठी स्वतंत्र होईल.

Sputnik V ही लस मॉस्कोच्या गमलेया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडिमोलॉडी अँड मायक्रोबायोलॉजी द्वारा तयार करण्यात आली आहे. ११ ऑगस्ट २०२० या लसीची नोंद करण्यात आली. ही लस भारतानेही मान्य केली आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने या लसीला अद्याप मान्यता दिलेली नाही.


हेही वाचा – Corona Vaccine: भारतात Sputnik V लशीच्या उत्पादनाला सुरुवात; पॅनेशिआ दरवर्षी तयार करणार १० कोटी डोस