घरदेश-विदेश'संसदेत फक्त हिंदीत आरडाओरडा; पातळी खालावली'

‘संसदेत फक्त हिंदीत आरडाओरडा; पातळी खालावली’

Subscribe

संसदेत हिंदी भाषेत केल्या जाणाऱ्या भाषणांमुळे संसदेत हिंदी भाषेत केल्या जाणाऱ्या भाषणांमुळे संसदेतील चर्चेचा स्तर खालावला असल्याचे विधान तामिळनाडूतील मरुमलारची द्रविड मुनेत्र कळघम (एमडीएमके) चे प्रमुख आणि राज्यसभा खासदार वायको यांनी केले आहे.

संसदेत हिंदी भाषेत केल्या जाणाऱ्या भाषणांमुळे संसदेतील चर्चेचा स्तर खालावला आहे. यापूर्वी संसदेत विविध विषयांचे सखोल ज्ञान असलेल्यांना पाठवले जात होते. मात्र, आज संसदेतील चर्चांची पातळी हिंदीमुळे खालावली आहे‘, असे विधान तामिळनाडूतील मरुमलारची द्रविड मुनेत्र कळघम (एमडीएमके) चे प्रमुख आणि राज्यसभा खासदार वायको यांनी केले आहे. त्यांच्या या विधनामुळे खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले राज्यसभा खासदार वायको ?

संसदेत केवळ हिंदीत आरडाओरडी करतात. एवढेच नाहीतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हिंदीतच भाषाण करतात, असेही त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्यांनी हे देखील विचारले की हिंदीत कोणते साहित्य आहे? तिची काहीच पाळमुळ नाहीत. तर संस्कृत एक मृत भाषा असल्याचेही ते यावेळी म्हणाले आहेत. वाइको यांनी जवाहरलाल नेहरू एक महान लोकशाहीवादी होते आणि त्यांनी क्वचितच कधीतरी संसदेचे सत्र सोडले असेल. मात्र, मोदी कधीतरी संसदेच्या सत्रात सहभाग नोंदवतात, असे सांगत मोदी आणि नेहरू यांची तुलना करत नेहरू पर्वत होते तर मोदी केवळ त्याचा एक हिस्सा असल्याचे देखील म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -