घरदेश-विदेशकॅनडा हिंदू मंदिरात तोडफोड, पोलिसांकडून दोन संशयितांचा शोध सुरू

कॅनडा हिंदू मंदिरात तोडफोड, पोलिसांकडून दोन संशयितांचा शोध सुरू

Subscribe

ओटावा : कॅनडामध्ये पुन्हा एकदा हिंदू मंदिराची तोडफोड (Hindu Temple Vandalised) झाल्याची घटना समोर आली आहे. आँटारियो (Ontario) प्रांतातील विंडसर (Windsor) शहरात ही घटना घडली असून भारताच्या विरोधात द्वेषपूर्ण घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. या घटनेतील दोन संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हिंदू मंदिराची तोडफोड याची घृणास्पद कृत्य म्हणून दखल घेत चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात अधिकाऱ्यांनी एक व्हिडिओ मिळवला आहे. या व्हिडीओमध्ये मध्यरात्री 12 वाजल्यानंतर दोन संशयित या परिसरात दिसत असून त्यातील एक संशयित व्यक्ती इमारतीच्या भिंतीची तोडफोड करताना दिसत आहे तर दुसरा त्याच्या बाजूला उभा असल्याचे दिसतो.

- Advertisement -

घटनेच्या वेळी, एका संशयिताने काळ्या रंगाचा स्वेटर, काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती. या पॅन्टच्या डाव्या पायावर पांढर्‍या रंगाचा लहान लोगो होता. दुसऱ्या संशयिताने काळी पँट, स्वेटशर्ट, काळे शूज आणि पांढरे मोजे घातले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -

कॅनडातील हिंदू मंदिरांमध्ये याआधीही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत, मात्र अजूनपर्यंत तिथल्या सरकारने कोणतीही कठोर कारवाई केलेली नाही. विंडसरमधील मंदिराची तोडफोड होण्याची ही पाचवी घटना आहे. याआधी 14 फेब्रुवारी रोजी मिसिसॉगा येथील राम मंदिरात तोडफोड करण्यासोबतच हिंदुविरोधी आणि भारतविरोधी घोषणाही लिहिण्यात आल्या होत्या.

यापूर्वी ब्रॅम्प्टन येथील गौरी शंकर मंदिर आणि रिचमंडच्या विष्णू मंदिरातही अनेक मूर्तींची विटंबना करण्यात आली. खलिस्तानी समर्थकांनी अनेकवेळा महात्मा गांधींच्या पुतळ्याला लक्ष्य करून भारतविरोधी घोषणाही लिहिण्यात आल्या होत्या.


हेही वाचा – ताजमहाल प्रेमाचे प्रतीक म्हणून स्वीकारण्यास भाजपा नेत्याचा नकार; शहाजहानचे मुमताजवर प्रेम होते तर…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -