वरूण गांधींचा भाजपला पुन्हा घरचा आहेर, शेअर केला अटल बिहारी वाजपेयी यांचा व्हिडीओ

उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खीरी येथील शेतकरी हत्याकांडावर शेतकऱ्यांचे समर्थन करणारे भाजप खासदार वरूण गांधी यांनी भाजपला पुन्हा घरचा आहेर दिला आहे. वरूण यांनी माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वाजपेयी शेतकऱ्यांचे समर्थन करत असून सरकारला इशारा देत आहेत. वरूण गांधी यांनी लखीमपुर हत्याकांडानंतर शेतकऱ्यांचे समर्थन केल्याने भाजप सरकार त्यांच्यावर नाराज आहे.

यामुळे अशा प्रकारे वाजपेयी यांनी देखील शेतकऱ्यांचे समर्थन केले होते. हेच भाजपला दाखवण्यासाठी वरूण गांधी यांनी वाजपेयी यांचा व्हिडीओ शेअर केल्याचे बोलले जात आहे. वाजपेयींचा हा व्हिडीओ १९८० सालचा आहे. त्यावेळी भाजपच्या अधिवेशनात वाजपेयींनी भाषण केले होते. शेतपीकाला योग्य भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी वाजपेयींना शेतकऱ्यांचे समर्थन केले होते.

व्हिडीओमध्ये वाजपेयी काय म्हणाले

मी सरकारला इशारा देतोय की हुकुमशाही सोडून द्या. घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. शेतकरी याला घाबरणारा नाही. आम्ही शेतकऱ्यांचा उपयोग राजकीय लाभासाठी करू इच्छित नाही. मात्र त्यांच्या योग्य मागण्यांचे आम्ही समर्थन करतो. पण जर सरकार दबाव आणत असेल कायद्याचा गैरवापर करत असेल शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला दबावतंत्र वापरून चिरडून टाकणार असेल तर शेतकऱ्यांच्या या संर्घषात उडी मारण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही. आम्ही त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभे राहू.

‘मैं सरकार को चेतावनी देना चाहता हूं कि दमन के तरीके छोड़ दीजिए. डराने की कोशिश मत कीजिए. किसान डरने वाला नहीं है. हम किसानों के आंदोलन का दलीय राजनीति के लिए