Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश 'वसुधैव कुटुम्बकम्' संकल्पनेला विश्व स्वीकारत आहे, चंद्रशेखर बानकुळेंकडून मोदींची प्रशंसा

‘वसुधैव कुटुम्बकम्’ संकल्पनेला विश्व स्वीकारत आहे, चंद्रशेखर बानकुळेंकडून मोदींची प्रशंसा

Subscribe

मुंबई : अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील ब्रॉवर्ड काऊंटीने नोव्हेंबर महिन्याला ‘हिंदू वारसा महिना’ (Hindu Heritage Month) म्हणून मान्यता दिली आहे. हिंदू धर्म जगातील सर्वात मोठा आणि सर्वात जुना धर्म असल्याचे सांगत ब्रॉवर्ड काऊंटीने त्याचे योगदान मान्य केले आहे. यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देतानाच, ‘वसुधैव कुटुम्बकम्’ संकल्पनेला विश्व स्वीकारत असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

ब्रॉवर्ड काऊंटीने नोव्हेंबर महिन्याला हिंदू वारसा महिना म्हणून मान्यता दिल्यामुळे फ्लोरिडा हे टेक्सास, ओहायो, मॅसॅच्युसेट्स, मिनेसोटा, व्हर्जिनिया या राज्यांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. हिंदू धर्म, संस्कृती, मूल्ये आणि परंपरा साजरे करण्यासाठी या राज्यांनी अलीकडेच मान्यता दिली आहे.

हेही वाचा – विघ्‍नविनाशक गणेशदेवा… लाडक्या बाप्पाच्या आवडत्या मोदकांची 10 दिवस रेलचेल

- Advertisement -

ब्रॉवर्ड काऊंटीने यासंबंधीचा ठराव केला आहे. हिंदू धर्म हा जगातील सर्वात मोठा आणि जुना धर्म आहे. 100हून अधिक देशांमध्ये हिंदू धर्माचे 1.2 अब्जपेक्षा जास्त अनुयायी आहेत. आदर, स्वातंत्र्य आणि शांतता या मूल्यांसाठी हा सनातन धर्म ओळखला जातो. हिंदू समाजातील लोकांनी आयटी, वैद्यकीय, विज्ञान, अभियांत्रिकी, वित्त, शिक्षण, ऊर्जा आणि व्यवसाय यासारख्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. योग, आयुर्वेद, ध्यान, खाद्यसंस्कृती, संगीत, कला या क्षेत्रांतही हिंदूंचे योगदान आहे आणि अमेरिकन समाजात ते स्वीकारले आहे, असे या ठरावात म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट केले आहे. हिंदू धर्म म्हणजे मानवी स्वीकृती, परस्पर आदर, स्वातंत्र्य आणि शांतता या मूल्यांवर भर देतो. तसेच योग, आयुर्वेद आणि संगीत यासारख्या क्षेत्रात हिंदू समुदायाच्या योगदानाचीही दखल महत्वपूर्ण ठरते. ज्यांनी अमेरिकन समाजाला समृद्ध केले आहे त्या धर्माचा हा आदर म्हणून हिंदू वारसा महिना जाहीर करण्यात आल्याचे ब्रॉवर्ड काऊंटीने म्हटले आहे. तिथे आता दिवाळी साजरी केली जाणार आहे. जी20च्या अभूतपूर्व यशानंतर जगावर प्रतिबिंबित होणारे हे भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व आहे. वसुधैव कुटुम्बकम् या संकल्पनेला विश्व स्वीकारत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा हा जागतिक सन्मान आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -